डॉ. गेल यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:27 IST2021-08-27T04:27:25+5:302021-08-27T04:27:25+5:30

लेखक प्रा. किसनराव कुराडे म्हणाले की, विदेशातून येवून डॉ. गेल ऑम्वेट यांनी विविध वंचित घटकासाठी प्रचंड मोठे काम केले. ...

Dr. Gayle should be given the Maharashtra Bhushan Award | डॉ. गेल यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा

डॉ. गेल यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा

लेखक प्रा. किसनराव कुराडे म्हणाले की, विदेशातून येवून डॉ. गेल ऑम्वेट यांनी विविध वंचित घटकासाठी प्रचंड मोठे काम केले. महिला, धरणग्रस्त, भूमिहीन, आदिवासी, निराधारांच्या न्यायासाठी पती भारत पाटणकर यांच्यासोबत रस्त्यावरच्या लढाईत सक्रिय राहिल्या. खऱ्या अर्थाने सत्यशोधन पद्धतीने त्या जगल्या. अमेरिकेतून येऊन देशात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या कार्याला सलाम म्हणून मी नुकतेच लेखन केलेले ‘शंभू कायन’ पुस्तक त्यांना अर्पण करीत आहे. त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची मागणी योग्य आहे; पण सत्तेत असलेल्यांना आयुष्यभर सत्यासाठी चळवळ केलेल्यांच्या कामाची दखल घ्यावी, असे वाटेल याची खात्री वाटत नाही. त्यांच्या निधनामुळे सामाजिक चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

प्रा. विश्वास देशमुख म्हणाले की, डॉ. गेल यांनी जाती व्यवस्थेच्या विरोधात चांगले काम केले. कष्टकरी महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी चळवळ केली. अनेक वेळा रस्त्यावरची लढाई केली.

अब्राहम आवळे म्हणाले की, डॉ. गेल यांनी परदेशातून येवून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामे केली आहेत. निराधार महिलांचे संघटन करून त्यांना न्याय मिळवून दिले. धरणग्रस्तांच्या चळवळीत अग्रभागी राहिल्या. त्यांच्या निधनाने मोठी हानी झाली.

करूणा मिणचेकर यांनी डॉ. गेल यांनी महिलांसंबंधी केलेल्या कामाचा आढावा घेतला. अनिल म्हमाने यांनी डॉ. गेल यांच्या विविध चळवळीतील सहभागाची माहिती दिली. डॉ. दयानंद ठाणेकर, रवी सरदार, सुभाष गुरव यांनी डॉ. गेल यांच्या कार्याचा आढावा घेतला. कपील राजहंस यांनी प्रास्ताविक केले. शोकसभेस मंदार पाटील, आनंदा कांबळे आदी उपस्थित होते.

फोटो : २६०८२०२१-कोल- शोकसभा

कोल्हापुरातील आदित्य सभागृहातील शोकसभेत प्रा. किसनराव कुराडे यांनी डॉ. गेल यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Dr. Gayle should be given the Maharashtra Bhushan Award