यड्रावमध्ये कौटुंबिक वादातून झालेल्या हत्याकांडांत चार जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 11:44 IST2018-10-06T10:53:00+5:302018-10-06T11:44:18+5:30

शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे कौटुंबिक वादातून झालेल्या हत्याकांडांत चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

double murder case family dispute in kolhapur | यड्रावमध्ये कौटुंबिक वादातून झालेल्या हत्याकांडांत चार जणांचा मृत्यू

यड्रावमध्ये कौटुंबिक वादातून झालेल्या हत्याकांडांत चार जणांचा मृत्यू

कोल्हापूर - शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे कौटुंबिक वादातून झालेल्या हत्याकांडांत चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबातल्या जावयाने केलेल्या हल्ल्यात त्याच्या सासू व मेहुणीचा जागीच मृत्यू झाला होता. तर पत्नी व मेहुणा गंभीर जखमी झाले होते. जखमींना उपचारासाठी सांगली येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान या दोघांचाही मृत्यू झाला आहे. यड्राव येथील शिरगावे मळ्यात शनिवारी मध्यरात्री  ही घटना घडली. 

जावयाने केलेल्या हल्ल्यात सासू छाया श्रीपती धुमाळ व मेहुणी सोनाली अभिषेक रावण, रुपाली प्रदीप जगताप, मेहुणा रोहित श्रीपती धुमाळ यांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोर प्रदीप विश्वनाथ जगताप हा फरार झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथके रवाना झाली होती. मात्र आता प्रदीप पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती मिळत आहे. प्रदीपने यंत्रमागाच्या लाकडी माऱ्याने घाव घालून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Web Title: double murder case family dispute in kolhapur