पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर उचगावनजीक दुहेरी अपघात; तिघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 18:48 IST2022-11-01T17:48:48+5:302022-11-01T18:48:53+5:30
उचगाव: पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उचगाव (ता. करवीर) येथे उड्डाण पुलावर दुहेरी अपघात झाला. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात ...

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर उचगावनजीक दुहेरी अपघात; तिघे जखमी
उचगाव: पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उचगाव (ता. करवीर) येथे उड्डाण पुलावर दुहेरी अपघात झाला. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात आज, मंगळवारी झाला. अपघात इतका भीषण होता की ट्रकचा समोरील भाग चकाचूर झाला होता. अपघातामुळे महामार्गावर तीन तास वाहतूक खोळंबली होती. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उचगाव हद्दीत एकाच ठिकाणी दोन वेगवेगळया वाहनाचे अपघात घडले. कार -मोटरसायकल अपघातात एका महिलेसह अन्य दोघे जखमी आहेत. तर, दुसऱ्या अपघातात बेळगाव कडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर चालकाने अचानक ब्रेक मारल्याने मागील कंटेनर पुढील कंटेनर वर आदळला. त्यामध्ये पाठीमागील कंटेनरच्या ड्रायव्हरचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत.
उजळाईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्रातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व गांधीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. जखमींना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.