जिल्ह्यातील ३ लाख बालकांना पोलिओचा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:57 IST2021-02-05T06:57:58+5:302021-02-05T06:57:58+5:30

कोल्हापूर : नव्या वर्षातील पहिली पोलिओ लसीकरण मोहीम रविवारी जिल्हाभर उत्साहात पार पडली. सकाळी ८ ते सायंकाळी ६ या ...

Dose of polio to 3 lakh children in the district | जिल्ह्यातील ३ लाख बालकांना पोलिओचा डोस

जिल्ह्यातील ३ लाख बालकांना पोलिओचा डोस

कोल्हापूर : नव्या वर्षातील पहिली पोलिओ लसीकरण मोहीम रविवारी जिल्हाभर उत्साहात पार पडली. सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेेळेत जिल्ह्यातील २ हजार ४५६ केंद्रांवर ३ लाख ३ हजार ५०९ बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले. लोकप्रतिनिधी, अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांनी हातात हात घालून काम करीत ही मोहीम यशस्वी केली. या मोहिमेत ७ हजार ७३६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

सीपीआरसह जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, शहरातील सरकारी दवाखाने, सार्वजनिक ठिकाण, बसस्थानक या ठिकाणी लसीकरणासाठी टीम तैनात करण्यात आली होती. या मोहिमेचा प्रारंभ सकाळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी अधिकाऱ्यांच्या हस्ते नुकत्याच जन्मलेल्या बालकासह पाच वर्षे वयोगटातील बालकांना डोस पाजण्यात आले.

सीपीआरमधील कार्यक्रमाला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, राज्य लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ, अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, जिल्हा‌ माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुख देसाई, परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य महानंदा मांढरे, सार्वजनिक आरोग्य परिचारक मोजस भोसले यांची उपस्थिती होती.

चौकट

आमदारांचा कृतीद्वारे संदेश

दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी मुलगा अर्जुन याला कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आणून लस पाजून घेतली. यानंतर पोलिओमुक्तीसाठी लस पाजून घेऊन प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन केले.

फोटो: ३१०१२०२१-कोल-पोलिओ ०१, ०२

फोटो ओळ : कोल्हापुरात रविवारी सीपीआरमध्ये जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अनिल माळी, निवासी वैद्यकीय अधिकारी हर्षला वेदक, राज्य लसीकरण अधिकारी दिलीप पाटील, माता व बालसंगोपन अधिकारी फारुक देसाई यांच्या उपस्थितीत बालकांना लसीकरण करण्यात आले.

फोटो: ३१०१२०२१-कोल-पोलिओ ०३

फोटो ओळ: कोल्हापुरात रविवारी पल्स पोलिओ मोहिमेतंर्गत बालकांना लस देण्यात आली. (छाया: आदित्य वेल्हाळ)

फोटो: ३१०१२०२१-कोल-पोलिओ ०४

फोटो ओळ: कोल्हापुरात रविवारी झालेल्या राष्ट्रीय पोलिओ लसीकरण अभियानातंर्गत कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात आमदार ऋतुराज पाटील यांनी मुलगा अर्जुन याला लसीकरण करून घेत अभियानाची सुरुवात केली.

Web Title: Dose of polio to 3 lakh children in the district