शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

तटस्थ राहू नका, उज्ज्वल भविष्यासाठी ‘काँग्रेस’ला बळ द्या  :सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 6:26 PM

भाजप सरकार हे खोटे आणि फसवे आहे. या सरकारने बेरोजगारी वाढविली आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणाऱ्या, शेतकऱ्यांना ताकद देणाऱ्या काँग्रेस पक्षाला आगामी निवडणुकीत बळ द्या. महाराष्ट्रातील सध्याच्या स्थितीकडे तटस्थ म्हणून पाहू नका. एकत्र या, सतर्क राहून जागृती करा, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी येथे तरुणाईला केले.

ठळक मुद्देतटस्थ राहू नका, उज्ज्वल भविष्यासाठी ‘काँग्रेस’ला बळ द्या  :सतेज पाटील‘एनएसयुआय’च्या मेळाव्यात तरुणाईला आवाहन

कोल्हापूर : भाजप सरकार हे खोटे आणि फसवे आहे. या सरकारने बेरोजगारी वाढविली आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणाऱ्या, शेतकऱ्यांना ताकद देणाऱ्या काँग्रेस पक्षाला आगामी निवडणुकीत बळ द्या. महाराष्ट्रातील सध्याच्या स्थितीकडे तटस्थ म्हणून पाहू नका. एकत्र या, सतर्क राहून जागृती करा, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी येथे तरुणाईला केले.भाजप सरकारविरोधातील ‘महाराष्ट्र एनएसयुआय’ची (नॅशनल स्टुडंटस् युनियन आॅफ इंडिया) बेरोजगार यात्रा बुधवारी कोल्हापुरात दाखल झाली. त्यानिमित्त काँग्रेस कमिटीमध्ये झालेल्या मेळाव्यात आमदार पाटील बोलत होते. ‘एनएसयुआय’चे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख प्रमुख उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, ‘देशात मंदीबरोबरच बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. ते कमी करण्याला प्राधान्य देण्याऐवजी भाजपचे नेते अन्य मुद्दे उपस्थित करत आहेत. केवळ घोषणा करणाऱ्या भाजप सरकारकडून युवकांच्या भवितव्यासाठी काहीच होणार नाही. रोजगाराच्या संधी वाढविणारे कॉँग्रेसचे सरकार आल्याशिवाय तरुणाईचे भवितव्य सुखकारक होणार नाही.

प्रदेशाध्यक्ष शेख म्हणाले, ‘तरुणाईचा कौल मिळाल्यामुळे भाजप सरकार पाच वर्षांपूर्वी सत्तेत आले; मात्र बेरोजगारी वाढवून या सरकारने तरुणाईचे भवितव्य अंधकारमय केले आहे. नोंदणीकृत ४५ लाख आणि नोंदणी नसलेले सुमारे ५० लाख युवक सध्या बेरोजगार आहेत. भाजप सरकारने नवे रोजगार, नोकऱ्या निर्माण करण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केली आहे. त्याबाबत राज्यातील तरुणाईला जागे करण्यासाठी ‘एनएसयुआय’द्वारे बेरोजगार यात्रा काढण्यात येत आहे. बेरोजगारी वाढविणाऱ्या भाजप सरकारला सत्तेतून बाहेर घालवा. काँग्रेसच्या पाठीशी राहा.’या मेळाव्यात बयाजी शेळके, दुर्वास कदम यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रवीण केसरकर, राहुल माने, सचिन चव्हाण, दिग्विजय मगदूम, दीपक थोरात, इंद्रजित बोंद्रे, नितीन बागी, सनी सावंत, आदी उपस्थित होते. एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष पार्थ मुंडे यांनी प्रास्ताविक केले. अभिषेक मिठारी यांनी सूत्रसंचालन केले. सुजय चव्हाण यांनी आभार मानले.नरेंद्र, देवेंद्र बेरोजगारीचे केंद्रमेळाव्यानंतर काँग्रेस कमिटी ते सीबीएस स्टँड परिसरातील राजीव गांधी पुतळ्यापर्यंत ‘एनएसयुआय’तर्फे पायी रॅली काढण्यात आली. त्याद्वारे बेरोजगार यात्रेला कोल्हापुरातून निरोप देण्यात आला. ‘नरेंद्र, देवेंद्र बेरोजगारीचे केंद्र’, ‘रोजगार आमच्या हक्काचा’ अशा घोषणा देत कार्यकर्ते, युवक-युवती या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर