रुग्ण महिलेशी असभ्य वर्तन प्रकरणी डॉक्टरला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 11:39 IST2020-12-05T11:38:44+5:302020-12-05T11:39:59+5:30
Crimenews, doctor, police, kolhapurnews दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या महिलेचा तपासणीच्या नावाखाली विनयभंग करणाऱ्या डॉक्टरला लक्ष्मीपुरी पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली. संदीप तातोबा कुंभार असे संशयिताचे नाव आहे.

रुग्ण महिलेशी असभ्य वर्तन प्रकरणी डॉक्टरला अटक
ठळक मुद्देरुग्ण महिलेशी असभ्य वर्तन प्रकरणी डॉक्टरला अटकलक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार
कोल्हापूर : दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या महिलेचा तपासणीच्या नावाखाली विनयभंग करणाऱ्या डॉक्टरला लक्ष्मीपुरी पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली. संदीप तातोबा कुंभार असे संशयिताचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, डॉ. कुंभार याचा लक्षतीर्थ वसाहतीमध्ये दवाखाना आहे. या दवाखान्यात आजारी असल्याने तपासणीसाठी आलेल्या एका विवाहित महिलेशी गुरुवारी (दि. ३) रात्री डॉ. कुंभार याने असभ्य वर्तन केले.
या प्रकाराने घाबरलेल्या त्या विवाहित महिलेने नातेवाइकांसोबत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी डॉ. कुंभार याला अटक केली.