शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
2
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
3
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

वस्तू खरेदीनंतर पिशवीसाठी पैसे घेऊ नका: ग्राहक पंचायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 4:22 PM

मॉल व बझारमधून वस्तूच्या खरेदीनंतर त्या भरून दिल्या जाणाऱ्या पिशवीकरिता ग्राहकांकडून पाच रुपयांपासून १२ रुपये आकारले जात आहेत. तसेच या पिशवीवर आपल्याच मॉलची केली जात असलेली जाहिरात योग्य नाही. त्यामुळे वस्तू खरेदीनंतर ग्राहकांकडून पैसे घेऊ नका, असे लेखी पत्र शनिवारी (दि. ४) अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष अरुण यादव यांनी बिग बझार, स्टार बझार, रिलायन्स मॉलच्या व्यवस्थापनाला दिले.

ठळक मुद्देवस्तू खरेदीनंतर पिशवीसाठी पैसे घेऊ नका: ग्राहक पंचायतस्टार बझार, बिग बझार, रिलायन्स मॉल व्यवस्थापनला पत्र

कोल्हापूर : मॉल व बझारमधून वस्तूच्या खरेदीनंतर त्या भरून दिल्या जाणाऱ्या पिशवीकरिता ग्राहकांकडून पाच रुपयांपासून १२ रुपये आकारले जात आहेत. तसेच या पिशवीवर आपल्याच मॉलची केली जात असलेली जाहिरात योग्य नाही. त्यामुळे वस्तू खरेदीनंतर ग्राहकांकडून पैसे घेऊ नका, असे लेखी पत्र शनिवारी (दि. ४) अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष अरुण यादव यांनी बिग बझार, स्टार बझार, रिलायन्स मॉलच्या व्यवस्थापनाला दिले.वस्तू खरेदीनंतर मॉल व बझार व्यवस्थापनाकडून पिशवीसाठी स्वतंत्रपणे पैसे आकारले जातात. या संदर्भात ग्राहक पंचायतकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. याबाबत २९ एप्रिलला ‘लोकमत’मध्ये ‘मॉलमध्ये खरेदीनंतर पिशवी मोफतच द्यावी’ अशा आशयाचे वृत्त देऊन या विषयाला वाचा फोडण्यात आली होती.त्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष अरुण यादव हे पदाधिकाऱ्यांसह शनिवारी (दि. ४) उद्यमनगर येथील बिग बझार, जुन्या पुणे-बंगलोर मार्गावरील उड्डाणपुलाशेजारील स्टार बझार, लक्ष्मीपुरी येथील रिलायन्स मॉल येथे जाऊन व्यवस्थापनाला भेटले. या ठिकाणी ग्राहकांना पिशवीसाठी पैसे आकारू नयेत, असे लेखी पत्र संबंधितांना सादर केले.

चंदीगढ ग्राहक न्याय मंचने ‘बाटा’ कंपनीस नऊ हजार रुपये दंड केला आहे; कारण त्यांनी ग्राहकांकडून पिशवीचे तीन रुपये घेतले होते. तरी इथून पुढे पिशवीची विक्री केल्यास आपल्याविरोधात चंदीगड ग्राहक तक्रार निवारण मंचच्या केसच्या आधारावर कोल्हापूर ग्राहक तक्रार निवारण मंचकडे दाद मागितली जाईल, असा इशाराही या पत्राद्वारे देण्यात आला.यावेळी जिल्हा संघटक जगन्नाथ जोशी, जिल्हा उपाध्यक्ष दीपक बंडगर, कोषाध्यक्ष शिवनाथ बियाणी, सचिव अनिल जाधव, अ‍ॅड. ज्योत्स्ना ढासाळकर, विठोबा चव्हाण, राजू मोरे, अर्जुन पाटील, विश्वनाथ पोतदार, सागर पोवार, दयानंद सुतार, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर