कोल्हापूरची अनुजा पाटील कर्णधारपदी; शिवाली शिंदे 'टी-२०' क्रिकेट संघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 16:32 IST2025-10-06T16:30:01+5:302025-10-06T16:32:08+5:30
ही स्पर्धा येत्या ८ ऑक्टोबरला नागपूर येथे होणार

कोल्हापूरची अनुजा पाटील कर्णधारपदी; शिवाली शिंदे 'टी-२०' क्रिकेट संघात
कोल्हापूर : जिल्हा क्रिकेट असोसिएशनची खेळाडू अनुजा पाटीलची महाराष्ट्र महिला संघाच्या कर्णधारपदी निवड झाली; तर शिवाली शिंदे हिची ‘बीसीसीआय’मार्फत घेतल्या जाणाऱ्या टी-२० स्पर्धेसाठी महाराष्ट्र महिला सीनिअर टी २० संघात निवड झाली.
ही स्पर्धा येत्या ८ ऑक्टोबरला नागपूर येथे होणार आहे. महाराष्ट्र महिला संघ ईलिट ब ग्रुपमध्ये असून त्यात तामिळनाडू, मध्यप्रदेश, पुडुचेरी व राजस्थान महिला संघाचा समावेश आहे. अनुजा हिने यापूर्वी टी २०, एशिया कप, चॅलेंजर ट्राॅफी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. महाराष्ट्र १९ वर्षांखालील संघात सलग चार वर्षे आणि त्यांतील २ दोन वर्षे कर्णधारपद भूषविले. महाराष्ट्र खुल्या गटात महिला संघातही सलग ६ वर्षे कामगिरी बजाविली. भारतीय संघातून ऑस्ट्रेलिया, श्रीलंका दौऱ्यांतही उत्कृष्ट खेळ केला.
शिवाली शिंदे हिची बंगळुरू येथील १९ वर्षांखालील नॅशनल क्रिकेट अकॅडमीत निवड झाली होती. महाराष्ट्र महिला संघात समावेश होता. तिने महाऱाष्ट्र संघाचे कर्णधारपदही भूषविले, तसेच खुल्या पश्चिम विभागीय महिला क्रिकेट संघात उपकर्णधार पदाची जबाबदारी सांभाळली.