खोतवाडी येथे बांधकाम कामगारांना स्मार्टकार्ड वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:28 IST2021-08-22T04:28:18+5:302021-08-22T04:28:18+5:30

यवलूज : खोतवाडी (ता.पन्हाळा) येथे कर्मवीर बांधकाम संघटनेच्यावतीने बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड वाटप कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच ...

Distribution of smart cards to construction workers at Khotwadi | खोतवाडी येथे बांधकाम कामगारांना स्मार्टकार्ड वाटप

खोतवाडी येथे बांधकाम कामगारांना स्मार्टकार्ड वाटप

यवलूज : खोतवाडी (ता.पन्हाळा) येथे कर्मवीर बांधकाम संघटनेच्यावतीने बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड वाटप कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच गीतांजली गुरवळ होत्या. यावेळी बाजार समितीचे माजी संचालक शशिकांत आडनाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय खडके यांनी शासन स्तरावरून बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक योजनांविषयी मार्गदर्शन करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. नोंदणी निरीक्षक गोरखनाथ थोरवत यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन बांधकाम कामगारांना स्मार्टकार्ड वाटप केले.

कार्यक्रमाला ग्रामसेवक दीपक घाटगे, संघटनेचे उपाध्यक्ष जोतिराम पाटील, सतीश काशीद, विजय मगर, विकास विचारे, विश्वास चोपडे, नारायण मडके, कृष्णात शिंदे, राम गोडसे, उज्ज्वला पाटील, राणी चौगले, शिवाजी चौगले, योगेश आदी उपस्थित होते. अमृतराज रणदिवे यांनी आभार मानले.

फोटो ओळ- खोतवाडी येथे कर्मवीर संघटनेतर्फे बांधकाम कामगारांना स्मार्टकार्ड वाटप करताना गोरखनाथ थोरवत, शशिकांत आडनाईक, गीतांजली गुरवळ आदी.

Web Title: Distribution of smart cards to construction workers at Khotwadi