शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँकेच्या प्रचारतोफा थंडावल्या

By admin | Updated: May 4, 2015 00:36 IST

उद्या मतदान

जिल्हा बॅँकेच्या प्रचारतोफा थंडावल्या;उद्या मतदान सांगली : गेल्या आठवडाभर धडाडणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारतोफा रविवारी सायंकाळी थंडावल्या. प्रचारसभा, बैठका, छुप्या हालचालींनी उडालेला प्रचाराचा धुरळा खाली बसला असला, तरी रात्रीच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. कोठेही दगाफटका होऊ नये म्हणून दोन्ही पॅनेलचे नेते उमेदवारांना ‘जागते रहो’चा संदेश देत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्या, मंगळवारी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या सहभागामुळे ही निवडणूक रंगतदार बनली आहे. आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सहकारी पॅनेल आणि कॉँग्रेसप्रणीत रयत सहकार परिवर्तन पॅनेलमध्ये ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले जयंत पाटील व मदन पाटील एकत्र आले आहेत. दिग्गज नेत्यांची फौज शेतकरी सहकारी पॅनेलकडे असल्याने त्यांनी जिल्हाभर प्रचारसभा व बैठकांवर जोर दिला आहे. दुसरीकडे मदन पाटील यांनी अचानक कॉँग्रेसचे पॅनेल सोडून शेतकरी सहकारी पॅनेलमध्ये सहभाग घेतल्याने खचलेल्या कॉँग्रेसप्रणीत पॅनेलला पतंगरावांनी आधार दिला आहे. पतंगरावांच्या सहभागामुळे ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात रंगतदार स्थितीत पोहोचली आहे. गेल्या चार दिवसांपासून दोन्ही पॅनेलच्या नेत्यांमध्ये चिखलफेक सुरू आहे. या जाहीर आरोप-प्रत्यारोपांना आज पूर्णविराम मिळाला. दोन्ही पॅनेलचे नेते छुप्या प्रचारात गुंतले आहेत. रविवारी रात्री उशिरापर्यंत सांगली, मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यांमध्ये छुप्या बैठका सुरू झाल्या होत्या. दगाफटक्याची शक्यता ज्या तालुक्यांमध्ये दिसत आहे, त्याठिकाणी अधिक सतर्कता बाळगली जात आहे. त्यामुळेच दोन्ही पॅनेलच्या नेत्यांनी उमेदवारांना आणि तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना ‘जागते रहो’चा संदेश दिला आहे. (प्रतिनिधी) मतमोजणी ७ रोजी जिल्हा बॅँकेच्या १९ जागांसाठी मंगळवारी १२ केंद्रांवर मतदान होणार आहे. मतमोजणी गुरुवारी (दि. ७) सकाळी आठ वाजल्यापासून तरुण भारत क्रीडांगणातील हॉलमध्ये दहा टेबलवर होणार आहे.