शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचा सहकार मोडण्याचा डाव-‘लोकमत’ वृत्ताची चर्चा

By admin | Updated: December 19, 2014 00:25 IST

डिसोझा यांचा आरोप : कृती समिती स्थापन; ‘निवडणूक निधी’ला तीव्र विरोध

गडहिंग्लज : सर्वसामान्य माणसांच्या गरजांमधून विविध सहकारी संस्थांची निर्मिती झाली. या संस्थांच्या मदतीमुळेच सामान्य माणसाची प्रगती झाली. मात्र, प्राधिकरणाच्या माध्यमातून सहकारी संस्था मोडीत काढण्याचाच शासनाचा डाव आहे, असा आरोप आजरा तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा यांनी केला.राज्य सहकारी प्राधिकरणाकडून सहकारी संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात निर्गमित परिपत्रकातील निवडणूक निधीविषयी विचारविनिमयासाठी येथील देखरेख संघाच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते अध्यक्षपदावरून बोलत होते. प्राधिकरणाने आकारलेल्या निवडणूक निधीस यावेळी तीव्र विरोध करण्यात आला.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्ड्यान्नावर म्हणाले, सहकारी संस्थांमधील सभासदांच्या पैशाची काळजी घेण्याबरोबरच निवडणुकीतील उधळपट्टी थांबायला हवी. सहकार वाचविण्यासाठी व्यापक लढ्याची गरज आहे.अरुण देसाई म्हणाले, सहकाराच्या शुद्धिकरणासाठी प्राधिकरणाची स्थापना झाली, ही चांगली बाब असली तरी अवाजवी निवडणूक निधीची अट अन्यायकारक आहे.सुरेश पोवार म्हणाले, शासनाच्या दुटप्पी भूमिकेचा ग्रामीण अर्थव्यवस्थेला धोका आहे. त्याविरुद्ध राज्यव्यापी आंदोलनाची गरज आहे.दरम्यान, प्राधिकरणाच्या आदेशाविरुद्ध सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दाद मागण्याचा निर्णय बैठकीत झाला. यावेळी भिवा जाधव, शांताराम हजगूळकर, रखमाना आपगे, हणमंत साठे, प्रकाश कोरी, सिदनाईक यांनीही मनोगते व्यक्त केली. बैठकीस जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक संगाप्पा साखरे, गडहिंग्लज तालुका फेडरेशनचे अध्यक्ष राजू खलिफा, दुंडाप्पा हिडदुगी, शिवाजीराव मगदूम, आदी उपस्थित होते. रमेश चव्हाण यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)‘लोकमत’ वृत्ताची चर्चानिवडणूक प्राधिकरणाच्या अन्यायी परिपत्रकाविरूद्ध सहकारी संस्था एकवटल्याची बातमी ‘लोकमत’ने आज, गुरूवारच्या अंकात प्रसिद्ध केली होती. बैठकीत या बातमीची चर्चा झाली. ‘लोकमत’चा अंक हातात घेऊनच काही संस्था प्रतिनिधींनी आपली भूमिका रोखठोकपणे मांडली.कृती समितीची स्थापनाप्राधिकरणाच्या अन्यायी परिपत्रकाविरूद्ध संघर्षासाठी गडहिंग्लज उपविभागातील सहकारी संस्था प्रतिनिधींची कृती समिती स्थापन झाली. आजऱ्याचे माजी सभापती अल्बर्ट डिसोझा यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत अरूण देसाई, सुरेश पोवार, राजू खलिफा (गडहिंग्लज), शांताराम हजगुळकर, सूर्यकांत पाटील, विलास नार्वेकर (चंदगड), आनंदराव कुंभार, एस. बी. चव्हाण (आजरा) व निमंत्रित सदस्य म्हणून राजेंद्र गड्ड्यान्नावर यांचा समावेश आहे.