तुळशी धरणात आपत्ती व्यवस्थापनची प्रात्यक्षिके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 16:55 IST2020-07-08T16:51:10+5:302020-07-08T16:55:00+5:30
धामोड (ता .राधानगरी ) येथील तुळशी मध्यम प्रकल्प जलाशयामध्ये आज दुपारी दोन वाजता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती , राधानगरी तहसिलदार मिना निंबाळकर व पोलीस मित्र सेवाभावी संघटना महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमाने आपत्ती व आपत्तीपुर्व प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या कार्यक्रमात यांत्रिक बोटीचे प्रात्यक्षिक, सेप्टी रिंग, बुडणाऱ्या व्यक्तीला कसे वाचवावे याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली

धामोड येथील तुळशी जलाशयामध्ये आपत्ती प्रात्यक्षिका वेळी उपस्थित अधिकारी व स्वयंसेवक (छाया - श्रीकांत ऱ्हायकर)
धामोड- धामोड (ता .राधानगरी ) येथील तुळशी मध्यम प्रकल्प जलाशयामध्ये आज दुपारी दोन वाजता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती, राधानगरी तहसिलदार मिना निंबाळकर व पोलीस मित्र सेवाभावी संघटना महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमाने आपत्ती व आपत्तीपुर्व प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या कार्यक्रमात यांत्रिक बोटीचे प्रात्यक्षिक, सेप्टी रिंग, बुडणाऱ्या व्यक्तीला कसे वाचवावे याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली .
यावेळी महापुराच्या काळात बुडणाऱ्या व बुडालेल्या व्यक्तीस पाण्याच्या पुरातुन बाहेर कसे काढण्यात यावे, बोट सुरू करण्यापासून ते त्या बुडणाऱ्या माणसाला नदीतिरावर पोहचवण्यापर्यतची प्रात्यक्षिके दाखण्यात आली.
यावेळी राधानगरीचा तहसीलदार मिना निंबाळकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापण अधिकारी प्रसाद संकपाळ, तुळशी धरण शाखा अभियंता विजयराव आंबोळे , पोलीस सेवक संघटनेचे चंद्रकांत डोंगळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापक कृष्णात सोरट, समर्थ चौगले, पोलीस मित्र रणजीत पाटील, राजू माने, महेश कांबळे, अक्षय दामुगडे हे उपस्थित होते.