शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनचा गैरफायदा मुदत संपलेला माल ग्राहकांच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:25 IST

गगनबावडा तालुक्यातील एका गावामध्ये मुदत संपलेल्या श्रीखंडाची विक्री राजरोस करण्यात येत होती; परंतु एका सुशिक्षित माणसाच्या हाती हे श्रीखंड ...

गगनबावडा तालुक्यातील एका गावामध्ये मुदत संपलेल्या श्रीखंडाची विक्री राजरोस करण्यात येत होती; परंतु एका सुशिक्षित माणसाच्या हाती हे श्रीखंड पडल्याने या श्रीखंडामध्ये अळी सापडल्याने त्या गावामध्ये गाव बैठक घेण्यात आली. यामध्ये गगनबावडा तालुक्याच्या पूर्वेस असणाऱ्या एका कंपनीची ती श्रीखंड डबी मुदत संपूनही दुकानदार ग्राहकांच्या माथी मारत होते. त्यामुळे सदर दुकानदारांना गाव बैठकने पुन्हा असे घडल्यास कारवाईची धमकी दिल्याने यावर पडदा पडला परंतु याशिवाय काही दुकानदार आपला खाद्यपदार्थ माल अव्वाच्या सव्वा दराने विकत असून त्या दुकानदारांनी नागरिकांना वेठीस धरले आहे. गगनबावडा तालुक्यातील तहसील विभागाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालून ग्राहकांना वेठीस धरणाऱ्या किराणा दुकानदारावर कडक कारवाईची गरज आहे. यापूर्वी थंडपेयामध्ये, बटरमध्ये अळी सापडण्याची घटना गगनबावडा तालुक्यातील काही गावांमधील ग्रामस्थानी संबंधित ग्रामपंचायतमध्ये करण्यात आली होती. यामुळे गगनबावडा तालुक्यातील तहसील विभागाने याकडे तत्काळ लक्ष घालून ग्राहकांना वेठीस धरणाऱ्या या दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी ग्राहकांतून होत आहे.