'चंदगड-कोल्हापूर'चा थेट संपर्क तुटला, भडगाव पुलावर पाणीच पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 07:58 IST2023-07-24T07:57:27+5:302023-07-24T07:58:20+5:30

गडहिंग्लजनजीक भडगाव पूलावर पाणी,वाहतूक बंद

Direct connection of 'Chandgad-Kolhapur' is broken, water is water on Bhadgaon bridge | 'चंदगड-कोल्हापूर'चा थेट संपर्क तुटला, भडगाव पुलावर पाणीच पाणी

'चंदगड-कोल्हापूर'चा थेट संपर्क तुटला, भडगाव पुलावर पाणीच पाणी

राम मगदूम

गडहिंग्लज( जि.कोल्हापूर) : गडहिंग्लज - चंदगडचा मार्गावर असणाऱ्या हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पूलावर रविवारी रात्री दहाच्या सुमारास पाणी आले.त्यामुळे 'गडहिंग्लज - चंदगडचा' पर्यायाने 'चंदगड - कोल्हापूर'चा थेट संपर्क तुटला असून या मार्गावरील वाहतूक बंद गजरगावमार्गे वळविण्यात आली आहे.    

दरम्यान, दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे हिरण्यकेशी नदीवरील ऐनापूर,इंचनाळ,निलजी तर घटप्रभा नदीवरील कानडेवाडी या कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यावर  पाणी आले आहे.त्यामुळे या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे. गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील वाहतूक खानापूर गेट हलकर्णीमार्गे तर पश्चिम भागातील वाहतूक बेळगुंदी- इंचनाळ- गजरगावमार्गे वळविण्यात आली आहे.

Web Title: Direct connection of 'Chandgad-Kolhapur' is broken, water is water on Bhadgaon bridge