Kolhapur: सेलमच्या चांदी व्यावसायिकाची ७४ लाखांची फसवणूक, हुपरी पोलिसांत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 16:52 IST2025-03-27T16:51:49+5:302025-03-27T16:52:08+5:30
हुपरी : बनावट भेसळयुक्त चांदी देऊन कोल्हापूरच्या सराफाची फसवणूक करणारा रेंदाळचा धनंजय दिलीप पाटील याने सेलम (तामिळनाडू)मधील एका चांदी ...

Kolhapur: सेलमच्या चांदी व्यावसायिकाची ७४ लाखांची फसवणूक, हुपरी पोलिसांत गुन्हा दाखल
हुपरी : बनावट भेसळयुक्त चांदी देऊन कोल्हापूरच्या सराफाची फसवणूक करणारा रेंदाळचा धनंजय दिलीप पाटील याने सेलम (तामिळनाडू)मधील एका चांदी व्यावसायिकाची सुमारे ७४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा बुधवारी हुपरी पोलिसांत दाखल झाला आहे.
धनंजय पाटील सध्या राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या कोठडीची हवा खात आहे. मूळचे तासगाव तालुक्यातील असलेले, पण व्यवसायानिमित्ताने सेलममध्ये वास्तव्यास असलेले सचिन पाटील यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांतून समजलेली माहिती अशी, सचिन पाटील यांचा सेलममधील कारागिरांकडून विविध डिझाइन्सचे चांदीचे दागिने तयार करून घेऊन विविध भागांतील पेठेवरील सराफांना पोहोच करण्याचा व्यवसाय आहे. धनंजय पाटील याने काही दिवसांची मुदत मागून घेत उधारीवर त्यांच्याकडून सन २०२१ मध्ये ७४ लाख रुपये किमतीचे ११२ किलो चांदीचे दागिने खरेदी केले होते.
गेल्या चार वर्षांच्या कालावधीत सचिन पाटील यांनी वारंवार उधारीची रक्कम वसुलीसाठी पाठपुरावा केला असतानाही धनंजय पाटील यांने अद्यापपर्यंत उधारीची रक्कम परत केलेली नाही. त्यामुळे चांदी व्यावसायिक सचिन पाटील यांनी बुधवारी हुपरी पोलिसांत येऊन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.