कोल्हापुरातील जोतिबा डोंगरावरील पुजारी-भाविक मारहाण प्रकरण तापलं, निषेधार्थ भाविकांचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 16:50 IST2026-03-30T16:49:40+5:302026-03-30T16:50:54+5:30

देखाव्यातून मांडली पुजाऱ्यांची वागणूक

Devotees march in Kolhapur to protest against the priest devotee assault case on Jotiba hill | कोल्हापुरातील जोतिबा डोंगरावरील पुजारी-भाविक मारहाण प्रकरण तापलं, निषेधार्थ भाविकांचा मोर्चा

छाया : नसीर अत्तार

कोल्हापूर : पुजाऱ्यांनी भाविकांना बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ परितेसह (ता.करवीर) भोगावती खोऱ्यातील ग्रामस्थांनी जोतिबा देवस्थानच्या पुजाऱ्यांविरोधात कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. या मोर्चात महिलांसह नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. 

हलगी वादनावरुन पुजारी व परिते ग्रामस्थांमध्ये झालेल्या वादातून पुजाऱ्यांनी भाविकांना बेदम मारहाण केली. शिवाय भाविकांनी मद्यप्राशन केल्याची बदनामी केल्याचा आरोप करत परितेसह भोगावती खोऱ्यातील कुरुकली, हळदी, घोटवडे, राशिवडे, ठिकपुर्ली, कोथळी, कांडगाव, देवाळे, कौलव, सिरसेसह पंचक्रोशीतल ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. 

सकाळी ११ वाजल्यापासून भोगावती खोऱ्यातील नागरिक दसरा चौकात येण्यास सुरुवात झाली. शहाजी कॉलेजच्या मैदानावर नागरिक जमा होत होते. तेथून १२ :३० च्या दरम्यान नागरिक मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. नाही चालणार, नाही चालणार दादागिरी नाही चालणार, जोतिबा मंदिरातील दोषी पुजाऱ्यांना अटक झालीच पाहिजे, भाविकांना न्याय मिळायलाच हवा, पूजारी हटाव जोतिबा बचाव यासह अनेक फलक घेऊन मोर्चेकरी दसरा चौक, व्हिनस कॉर्नरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. येथे मोर्चेकरांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

देखाव्यातून मांडली पुजाऱ्यांची वागणूक

या मोर्चात जोतिबावरील पूजारी भाविकांना कशा प्रकारे वागणूक देतात याचा एक सजीव देखावा तयार करण्यात आला होता. एका ट्रॅक्टर ट्रॉलीत केदार पाटील या सहावीतील मुलाला जोतिबा बनवण्यात आले होते. तर पुढे पाच-सहा पुजारी एका भाविकाच्या डोक्यावर नारळ फोडत आहेत असा देखावा केला होता.

Web Title : कोल्हापुर: ज्योतिबा मंदिर के पुजारियों के हमले से भड़का आक्रोश, भक्तों का मार्च

Web Summary : कोल्हापुर में ज्योतिबा मंदिर के पुजारियों द्वारा भक्तों पर कथित हमले के खिलाफ ग्रामीणों ने विरोध प्रदर्शन किया। हजारों लोगों ने कलेक्टर कार्यालय तक मार्च किया, न्याय और पुजारियों को हटाने की मांग की। एक झांकी में पुजारियों द्वारा भक्तों के साथ कथित दुर्व्यवहार को दर्शाया गया।

Web Title : Kolhapur: Jyotiba Temple Priests' Assault Sparks Protests, Devotees March

Web Summary : Villagers protested against Jyotiba temple priests in Kolhapur for allegedly assaulting devotees. Thousands marched to the Collector's office, demanding justice and the priests' removal. A tableau depicted the priests' alleged mistreatment of devotees.