शहरं
Join us  
Trending Stories
1
टेरिफविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तर अमेरिका संपली...; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी भीती
2
“राष्ट्रभक्तीचा नवा अध्याय, सत्तेसाठी भाजप+एमआयएम अकोट पॅटर्न”; ठाकरे गटाच्या नेत्यांची टीका
3
अमेरिकेने व्हेनेझुएलावर अज्ञात शस्त्र वापरले, मादुरोंचा गार्ड म्हणाला, "नाक-तोंडातून रक्त येत होतं आणि..."
4
IMPS द्वारे पैसे पाठवणं महागणार; 'या' दिग्गज सरकारी बँकेनं कोट्यवधी ग्राहकांना दिला मोठा झटका
5
इथे कंपन्यांना सर्व्हिस सेंटर उघडता येईनात...! मारुती पेट्रोल पंपावरच कार सर्व्हिस करून देणार...
6
तातडीने इराण सोडा, आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे बाहेर पडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश
7
प्रसिद्ध हॉलिवूड स्टारने व्यक्त केली शाहरुख खानसोबत काम करण्याची इच्छा; म्हणाला, 'त्याने मला...'
8
मराठी मुलांना नोकरी देण्यास उद्योगपतीचे स्वागत केले; गैर काय? फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
9
इराणसोबत व्यापार कराल तर २५% टॅरिफ द्यावा लागेल...! ट्रम्प यांची पुन्हा धमकी; या देशांवर होणार थेट परिणाम
10
२०२६ची पहिली षट्तिला एकादशी: अनंत कृपा लाभेल, काही कमी पडणार नाही; ‘असे’ करा व्रत पूजन!
11
Stock Market Holidays: गुरुवार १५ जानेवारीला शेअर बाजाराचं कामकाम राहणार बंद; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या
12
६ दिवसांत ५ ग्रहांचे गोचर: ७ राशींची संक्रांत संपणार, लक्षणीय लाभ; पैशांचा ओघ, सुखाचा काळ!
13
आजचे राशीभविष्य, १३ जानेवारी २०२६: नोकरी, व्यवसायात लाभ, नशिबाची साथ; अनुकूल दिवस
14
पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याची स्पर्धा; राज यांनी पाच हजारांना मत विकणाऱ्यांचे कान टोचले
15
एफआयआरची माहिती लपवली; किशोरी पेडणेकरांविरोधात याचिका, निवडणुकीनंतर सुनावणी होणार
16
'लाडक्या बहिणींना' आगाऊ रक्कम देण्यास निवडणूक आयोगाची मनाई; डिसेंबरचे १,५०० रुपये देण्यास मुभा
17
'...तर मी वकील, शिंदे कामगार नेते, अजितदादा झाले असते इन्स्पेक्टर': मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
डोंबिवलीत निवडणुकीला हिंसक वळण! भाजप उमेदवाराचे पती गंभीर जखमी; कार्यकर्त्यांमध्ये रात्रभर राडा
19
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
20
मतदान केंद्रावर मोबाइलबंदी आहे की नाही? निवडणूक आयोगाचे स्पष्ट आदेशच नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस शिवसेनेत येतायत का? संभाजीराजेंवरून संजय राऊतांची विचारणा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 16:13 IST

संभाजीराजे आणि शिवसेना यांच्यातील हा संबंध असल्याचे सांगत यात इतरांनी चोंबडेपणा करु नये असे सांगितले.

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणारे आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. शिवसेनेने सुरु केलेल्या शिवसंपर्क अभियानअंतर्गत आज त्यांची जाहीर सभा होणार आहे. याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना राज्यसभा निवडणुकीवरुन सुरु असलेल्या राजकीय घडामोडीसह विविध मुद्यावर भाष्य केले.

संभाजीराजेंनी काल, पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शब्द मोडल्याचा आरोप केला. यावरुन शिवसेनेने प्रत्युत्तर देखील दिले. आज याच मुद्यावर माध्यमांनी राऊतांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण केला जातोय तो चुकीचा आहे. ती शिवसेनेची जागा आहे. त्या जागेवर शिवसेनेचाच उमेदवार आणायचे हे ठरलं होत. पुरस्कृत बाबत सहकाऱ्यांशी बोलावे लागेल असेही मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना सांगितले होते. तो विषय संपला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्टच सांगितले.

फडणवीस आमच्या पक्षात येतात का?संभाजीराजेंच्या उमेदवारींवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली होती. यावरुन राऊत म्हणाले यासर्व घडामोडीत त्यांचा संबंध काय? नसेल त्यांनी ४२ मते द्यावी असे सांगत आम्ही त्यांना याबाबत उत्तर का द्यायची असा प्रतिसवालच केला. आमच्या पक्षासंदर्भातील निर्णयात आम्ही त्यांना उत्तर द्यायला फडणवीस आमच्या पक्षात येतात का असा टोला लगावला.

कोणता तरी पक्ष धरावाच लागतोराजकारणात करिअर करायचं असेल तर कोणता तरी पक्ष धरावाच लागतो. राजे, महाराजे, संस्थानिक आहेत त्यांना कोणता तरी पक्ष धरावाच लागतो असे सांगत त्यांनी राजस्थान, जयपूर राजघराण्याचे उदाहरण देखील दिले.

इतरांनी चोंबडेपणा करु नयेराज्यसभा उमेदवारीवरुन संभाजीराजेंना शिवसेनेने पाठिंबा दिला नसल्याने भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे. यावरुन प्रश्न विचारला असता राऊतांनी हा विषय संभाजीराजे आणि शिवसेना यांच्यातील असल्याचे सांगत यात इतरांनी चोंबडेपणा करु नये असे सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती