शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

पाटगाव परिसरचा विकास नवा अध्याय लिहिणारा असेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:30 IST

आबिटकर म्हणाले, प्रत्येकाच्या मनामनांत असणाऱ्या आणि सामान्यांना असामान्य वाटणाऱ्या शिवाजीनगर रस्त्याचे काम आपल्या हातून घडले याचा मनस्वी आनंद होत ...

आबिटकर म्हणाले, प्रत्येकाच्या मनामनांत असणाऱ्या आणि सामान्यांना असामान्य वाटणाऱ्या शिवाजीनगर रस्त्याचे काम आपल्या हातून घडले याचा मनस्वी आनंद होत आहे. पाटगाव प्रकल्पात पुनर्वसित झालेल्या लोकांच्या त्यागामुळे तालुक्यातील सर्वसामान्य माणसाच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने प्रकल्पांतर्गत गेलेल्या जमिनींना योग्य मोबदला मिळवून देणे तसेच पुनर्वसित लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. या परिसरातील रांगणा किल्ला, मौनी जलाशय, मौनी मठ तसेच पाटगाव परिसराचे पर्यटकांना नेहमीच आकर्षण राहिले आहे.

त्यामुळे या परिसरातील जमिनीचे मोल लक्षात घेऊन जमिनी न विकण्याचे आवाहनही आबिटकर यांनी केले. या वेळी एम. जी. लाड, रावजी लाड यांनी मनोगत व्यक्त केले.

या वेळी माजी सभापती बाबा नांदेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, तालुकाध्यक्ष अविनाश शिंदे, संदीप वरंडेकर, संग्राम सावंत, सरपंच विलास देसाई, उपसरपंच महेश पिळणकर, मधुकर लाड, पांडुरंग लाड, रामचंद्र लाड, उत्तम हडकर, विठ्ठल हडकर, नंदकुमार ठाकूर, आप्पा ठाकूर, गोविंद पिळणकर, अनिल सावंत, अस्मिता वर्दम, विजेता मसुरेकर, भगवान पाटील, मंदार म्हाडगुत उपस्थित होते. रत्नाकर लाड यांनी सूत्रसंचालन केले तर प्रस्ताविक मधुकर लाड यांनी केले.

फोटो: शिवाजीनगर पाटगाव येथे डांबरीकरण रस्त्याच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी बोलताना आमदार प्रकाश आबिटकर. या वेळी उपस्थित बाबा नांदेकर, प्रकाश पाटील आदी.