शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

विकास संस्थांना २५ कोटी मिळणार, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १२०० संस्थांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:39 AM

विकास संस्था सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने पीककर्ज वाटपावर अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १८५२ पैकी निकषास पात्र ठरणाऱ्या १२०० संस्थांना २०१५-१६ ते २०१७-१८ या आर्थिक वर्षात वाटप

ठळक मुद्दे या निकषात जिल्ह्णातील सुमारे १२०० संस्था पात्र ठरत असून, गेल्या तीन वर्षांची किमान २५ कोटी रुपये अर्थसाहाय मिळणार आहेमाध्यमातून वर्षाला सरासरी १४०० कोटी पीककर्जांचे वाटप होते. या वाटपावर स्लॅबनुसार अर्थसाहाय्य दिले जाणार

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : विकास संस्था सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने पीककर्ज वाटपावर अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १८५२ पैकी निकषास पात्र ठरणाऱ्या १२०० संस्थांना २०१५-१६ ते २०१७-१८ या आर्थिक वर्षात वाटप केलेल्या पीककर्जावर सुमारे २५ कोटी रुपयांचा लाभ होणार आहे. तसा प्रस्ताव सहकार विभागाच्या वतीने राज्य सरकारकडे दोन दिवसांत पाठविला जाणार आहे.

महाराष्टत पीककर्ज वाटपामध्ये नाबार्ड, जिल्हा बॅँक आणि विकास संस्थांच्या माध्यमातून शेतकरी, अशी थ्री-टायर प्रणाली आहे. नाबार्ड ते शेतकरी या साखळीत व्याजाचे मार्जिन फुगत जात असल्याने शेतकरी अडचणीत येत असल्याने कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात ‘डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना’ सुरू केली. एक लाखापर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के, तर तीन लाखांपर्यंतचे केवळ दोन टक्के व्याजदराने शेतकºयांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाने विकास संस्था आतबट्ट्यात आल्या. व्याजाचे मार्जिन कमी झाल्याने संस्थांचा व्यवस्थापन खर्च भागत नाही.

परिणामी राज्यातील निम्म्याहून अधिक संस्था अनिष्ट दुराव्यात अडकल्या. या संस्थांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने २०१४ ला पीक कर्जवाटपाच्या प्रमाणात अर्थसाहाय्य करण्याचा निर्णय घेतला; पण गटसचिवांची वेतनश्रेणी एकच करण्याची अट व ३१ मार्च ती दुरुस्त करून सुधारित परिपत्रक काढण्यास चार वर्षे गेली. त्यानुसार आता सुधारित परिपत्रक काढण्यात आले असून, काही जिल्ह्यांतील संस्थांना हे पैसे मिळालेही आहेत.जिल्ह्यात १८५२ विकास संस्था कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून वर्षाला सरासरी १४०० कोटी पीककर्जांचे वाटप होते. या वाटपावर स्लॅबनुसार अर्थसाहाय्य दिले जाणार आहे.

२५ लाखांपर्यंत वाटप करणाºया संस्थांना १.५ टक्का, २५ ते ५० लाखापर्यंतच्या संस्थांना एक टक्का, ५० लाख ते एक कोटी कर्जवाटप करणाºया संस्थांना ०.७५ टक्का, तर एक कोटीपेक्षा अधिक वाटपावर ०.५० टक्का अर्थसाहाय्य दिले जाणार आहे; पण सरसकट सर्व संस्थांना अर्थसाहाय्य मिळणार नाही. व्यवस्थापन खर्च दोन टक्क्यांच्या आत व एकूण पीककर्ज वाटपाच्या ६० टक्के वसुली करणाºयांना संस्थांना याचा लाभ होणार आहे. या निकषात जिल्ह्णातील सुमारे १२०० संस्था पात्र ठरत असून, गेल्या तीन वर्षांची किमान २५ कोटी रुपये अर्थसाहाय मिळणार आहे. हे पैसे थेट संस्थांच्या खात्यावर वर्ग होणार आहेत. सहकार विभाग दोन दिवसांत प्रस्ताव पाठविणार आहे.पगार, खर्च भागणारव्याजसवलतीने घाईला आलेल्या विकाससंस्थांना या मदतीने थोडे बळ मिळणार आहे. यातून सचिव पगार वर्गणी, कर्मचारी पगार व किरकोळ खर्च भागविता येणार आहे.

तीन वर्षातील पीक कर्जआर्थिक वर्ष पीक कर्ज२०१५-१६ १४३१ कोटी ४१ लाख२०१६-१७ १४३६ कोटी ८१ लाख२०१७-१८ १३४२ कोटी ६७ लाख 

सरकारने विनाअट विकास संस्थांना अर्थसाहाय्य दिले पाहिजे. यामुळे अडचणीतील संस्था बाहेर येण्यास मदत होईल. यासाठी गटसचिव संघटना सरकारच्या पातळीवर प्रयत्नशील आहे.- संभाजीराव चाबूक(जिल्हाध्यक्ष, गटसचिव संघटना)

टॅग्स :FarmerशेतकरीbankबँकMONEYपैसाkolhapurकोल्हापूर