शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षारक्षक प्रकरणी देवस्थानने म्हणणे मांडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:29 IST

कोल्हापूर : निवृत्त माजी सैनिक असलेल्या सुरक्षारक्षकप्रश्नी गुरुवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने सचिव शिवराज नायकवडे यांनी निवडणूक ...

कोल्हापूर : निवृत्त माजी सैनिक असलेल्या सुरक्षारक्षकप्रश्नी गुरुवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने सचिव शिवराज नायकवडे यांनी निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांच्यापुढे आपले म्हणणे मांडले. १६ तारखेला याबाबतची पुढील सुनावणी होणार आहे. यावेळी पक्षकारांनी पुढील तारीख मागितली नाही तर ही अंतिम सुनावणी होऊन पुढील आठ ते दहा दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांना अंतिम अहवाल सादर केला जाईल.

अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेसाठी २००६ ला १६ निवृत्त माजी सैनिकांना सुरक्षारक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी कामगार कायद्याप्रमाणे वेतन मिळावा, त्यांना कायम करावे व इतक्या वर्षांच्या फरकाची रक्कम द्यावी अशी मागणी करून न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यापैकी १० सुरक्षारक्षकांनी तडजोड केली, मात्र सहा सुरक्षारक्षकांनी त्याला नकार देत न्यायालयातील लढा कायम ठेवला. कामगार न्यायालयापासून उच्च न्यायालयापर्यंत सगळीकडे त्यांच्या बाजूने निकाल लागूनही समितीने त्यांच्या मागण्यांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे या सुरक्षारक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्यासाठी निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांची नियुक्ती केली असून, या प्रकरणाची तिसरी सुनावणी गुरुवारी झाली.

यावेळी समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी समितीने या प्रकरणात केलेले आदेश, लेखा जबाब, तडजोडी, निकाल याबाबतची माहिती दिली. यावेळी कांबळे यांनी काही आदेश व कागदपत्र सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे पुढील सुनावणी पुढच्या गुरुवारी (दि. १६) होणार आहे. या सुनावणीत दोन्ही बाजूंनी कोणत्याही कारणासाठी मुदत मागितली नाही तर ही अंतिम सुनावणी असेल. यानंतर पुढील आठ ते दहा दिवसांत त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाईल.

---