शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

‘आधार’ असूनही निराधार...

By admin | Updated: February 19, 2015 23:37 IST

ई-आधार कार्ड ठरविले अनधिकृत : ज्येष्ठ नागरिकाची जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार

प्रवीण देसाई -कोल्हापूर -नागरिकांना खरी ओळख देणाऱ्या आधार कार्डची आता गॅसबरोबर रेशन व्यवस्थेमध्येही सक्ती होऊ लागली आहे. ते मिळविताना नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. ई-आधार कार्ड असूनही ते ग्राह्य धरले जात नसल्याने नागरिकांची ससेहोलपट होत आहे. याविरोधात नुकतीच एका ज्येष्ठ नागरिकाने थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली आहे. नेहरूनगर, चिले कॉलनी परिसरातील जयवंत गणपती पेडणेकर या ज्येष्ठ नागरिकाने वर्षापूर्वी काढलेले आधार कार्ड अद्याप मिळालेले नाही. रेशनसाठी ते आवश्यकच असल्याचे सांगितल्यामुळे त्यांनी नेटवरून ई-आधार कार्ड काढले आहे. जोपर्यंत आपल्या घरी पोस्टाने हे कार्ड येत नाही, तोपर्यंत ई-कार्डच ग्राह्य धरण्यात येते. सध्या बहुधा हे कार्डच ग्राह्य धरले जात आहे; परंतु पेडणेकर यांना हे कार्ड अधिकृत नसून ते ग्राह्य धरले जात नसल्याचे सांगण्यात आले. या कार्डवर आपले नाव आहे, पत्ता आहे, शिवाय फोटोही आहे; असे असताना हे कार्ड गृहीत न धरणे म्हणजे या वयात अशा ज्येष्ठ नागरिकांची एकप्रकारे केलेली थट्टाच म्हटले तर वावगे ठरणार नाही; परंतु त्यांनी यावर गप्प न बसता आपल्यासारखा अन्याय इतर कुणावरही होऊ नये, यासाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार अर्ज दिला आहे. जर नेटवर ई-आधार कार्ड मिळत असेल तर ते नागरिकांना मिळण्यास वेळ का लागतो किंवा त्यांना ते का मिळत नाही? ते येत नसेल तर हातात असलेले ई-कार्ड का ग्राह्य धरले जात नाही? असा त्यांचा सवाल आहे. हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. ई-आधार कार्ड हे अधिकृत असून, ते ज्या ठिकाणी आवश्यक आहे, तेथे ते गृहीत धरलेच पाहिजे. जर कोणी याबाबत शंका उपस्थित करीत असेल तर ते चुकीचे आहे, असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.एका बाजूला रेशनचे अनुदान ग्राहकाच्या बॅँक खात्यावर जमा करण्यासाठी आधार कार्डही गरजेचे आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शहरात ठिकठिकाणी कार्ड काढण्यासाठी कॅँप लावले जात आहेत; परंतु ज्यांचे कार्ड ई-आधारच्या माध्यमातून मिळाले आहे, त्यांचे कार्ड गृहीत धरले जात नाही. त्यांनी काय करायचे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. या सावळ्यागोंधळाचा मानसिक त्रास आणि आर्थिक फटकाही नाहक नागरिकांना बसत आहे. याबाबत काहीतरी ठोस भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.ई-आधारकार्ड ग्राह्य धरण्याची मागणीहे कार्ड चालत नसेल तर ‘आधार’चे दुसरे कार्ड कुठले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आपल्यासारखा अन्याय इतरांवर होऊ नये, तसेच त्यांची फसवणूकही होऊ नये, यासाठी आपण जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी तक्रार अर्ज दिला आहे. - जयवंत पेडणेकर, ज्येष्ठ नागरिक