उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांनी काढली सामूहिक रजा उमरखेड येथील घटनेचा निषेध : ५० हून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:58 IST2021-02-05T06:58:22+5:302021-02-05T06:58:22+5:30
उमरखेड येथे कर्तव्य बजावत असलेले नायब तहसीलदार वैभव पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न रेतीमाफियांकडून केला ...

उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांनी काढली सामूहिक रजा उमरखेड येथील घटनेचा निषेध : ५० हून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग
उमरखेड येथे कर्तव्य बजावत असलेले नायब तहसीलदार वैभव पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न रेतीमाफियांकडून केला गेला. त्यांच्यावर कारवाई केली नाही, याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने आंदोलन पुकारले आहे. त्या आंदोलनाचा एक टप्पा म्हणून मंगळवारी संघटनेच्या सर्व सदस्यांनी सामूहिक रजा आंदोलन केले. कोल्हापूर जिल्ह्यात ११ उपजिल्हाधिकारी, १८ तहसीलदार व २० ते २५ नायब तहसीलदार आहेत. या सर्वांनी या आंदोलनात सहभाग घेतला. त्यामुळे कार्यालयांमध्ये या कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती जाणवत होती.
--
फोटो नं ०२०२२०२१-कोल-सामुहिक रजा आंदोलन
ओळ : उमरखेड (जि. यवतमाळ) येथील नायब तहसीलदारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी कोल्हापुरातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी सामूहिक रजा आंदोलन केले. यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
--