शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
4
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
5
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
6
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
7
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
8
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
9
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
10
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
11
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
12
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
13
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
14
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
15
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
16
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
17
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
18
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
19
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
20
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय क्रीडा संकुल : ठेकेदाराला नोटीस; दुधाळीच्या रेंजलाही मिळणार ४० लाखांचा निधी

By admin | Updated: November 30, 2014 01:01 IST

सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : विभागीय क्रीडासंकुलाचे काम जलद पूर्ण करा आणि त्याचा क्रीडापटूंना लाभ द्या. ज्या क्रीडामैदानांचे काम पूर्ण झाले आहे, ती खेळाडूंसाठी सुरू करा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी विभागीय क्रीडासंकुलाच्या आढावा बैठकीत दिले. विभागीय क्रीडासंकुलाची आढावा बैठक सार्वजनिक बांधकाममंत्री पाटील यांनी विभागीय क्रीडासंकुलाचे आतापर्यंतचे कामकाज, दर्जा, उर्वरित कामे यांसाठी आवश्यक निधी यांचा सविस्तर आढावा घेतला. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी मागणीप्रमाणे वाढीव दराने किती खर्च येणार आहे, याबाबत प्रस्ताव तयार करावा, असे सांगून या क्रीडासंकुलाचे काम उर्वरित कामांसह सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याबाबत चर्चा केली. याचबरोबर गेली अनेक वर्षे अनेक समस्यांनी ग्रासलेल्या व आंतरराष्ट्रीय नेमबाज जयसिंग कुसाळे, रमेश कुसाळे, तेजस्विनी सावंत, सध्याचे जिल्हा क्रीडाधिकारी नवनाथ फरताडे, आदींचा नेमबाजीचा प्राथमिक सराव ज्या शूटिंग रेंजवर झाला, त्या दुधाळी मैदान येथील शूटिंग रेंजचाही कायापालट करण्याचे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले आहेत. यासाठी त्यांनी स्वत:च्या निधीतून दहा लाख, आमदार अमल महाडिक यांच्या निधीतून दहा लाख व जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून अन्य वीस लाखांचा निधी देण्यात येईल. या बैठकीत आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी राजाराम माने, महापालिका आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, क्रीडा उपसंचालक एन. बी. मोटे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)