शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढ, वीज बिल माफीसाठी संभाजी ब्रिगेडची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:23 IST

कोल्हापूर : भरमसाट वाढलेले पेट्राेल, डिझेलचे दर कमी करावेत, लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ करावीत या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडने ...

कोल्हापूर : भरमसाट वाढलेले पेट्राेल, डिझेलचे दर कमी करावेत, लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ करावीत या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसोा गलांडे यांना दिले.

जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या महामारीमुळे आधीच रोजगारावर गदा आली आहे. कमाई तुटपुंजी झाली आहे. अशात जनता भरडून निघाली असताना वाढीव दराने वीज बिलांची आकारणी करून ती सक्तीने वसुलीचा सपाटा महावितरणने लावला आहे. महागाईने कहर केल्याने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यातच पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत चरितार्थ चालवणे अवघड बनत चालल्याने सरकारने इंधन दरवाढ मागे घ्यावी, वीज बिलांची माफी द्यावी; अन्यथा आता शांत असलेली जनता पुढे रस्त्यावर मोठ्या संख्येने उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही दिला. आंदोलनात अभिजीत भोसले, संदीप यादव, नीलेश सुतार, अभिजीत कांजर, भगवान कोईगडे, सागर गुरव, शाहबाज शेख, राजू राऊत, मदन परीट, सचिन गुरव यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

फोटो: ०९०२२०२१-कोल-संभाजी ब्रिगेड

फोटो ओळ: कोल्हापुरात मंगळवारी संभाजी ब्रिगेडने इंधन दरवाढ, वीज बिल माफीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.