शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

दूध उत्पादक सभासदांची आर्थिक मदतीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST

शब्बीर मुल्ला यवलूज: कोरोनाच्या महामारीच्या काळात ग्रामीण भागातील दूध उत्पादक चांगलाच आर्थिक अडचणीत सापडला असल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या बळीराजाला ...

शब्बीर मुल्ला

यवलूज: कोरोनाच्या महामारीच्या काळात ग्रामीण भागातील दूध उत्पादक चांगलाच आर्थिक अडचणीत सापडला असल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या बळीराजाला यापुढे संसाराचा गाडा चालवायचा कसा, या विंवचनेने ग्रासले आहे. त्यामुळे आर्थिक घडी विस्कटलेल्या दूध उत्पादक संभासदांना सहकारी दूधसंस्थांनी संस्थेच्या शिल्लक फंडाची रक्कम अथवा संस्थेतील नफ्याची रक्कम देऊन त्यांच्या फाटक्या संसाराला हातभार लावावा, अशी मागणी बहुतांशी ग्रामीण भागातील दूधउत्पादक सभासदांनी दूधसंस्थेकडे केली आहे.

ग्रामीण भागात दूधसंस्था याच दूध उत्पादक सभासदांच्या आर्थिक नाड्या आहेत. जिल्ह्यात आज हजारो दूधसंस्थेत ते दूध घालत आहेत.बहुतांशी शेतकरी दुधाच्या बिलावरच अवलंबून आहे.अनेक संस्थानी वर्षानुवर्षें संस्थेच्या नावावर ठेवी ठेवलेल्या आहेत. लाखो रुपयांच्या ठेवी बँकेत पडून आहेत.शिल्लक पैसा सभासदांचा आहे.सभासदांना आज पैशाची गरज आहे.आज कोरोनाकाळात अनेक कुटुंबांचा रोजगार गेला आहे.खासगी नोकर बिनपगारी घरी बसले आहेत.आज मुलाबाळांना सांभाळणे मुश्कील झाले आहे.अनेकांना आज पडत्या काळात पैशाची गरज आहे. दूधसंस्थांनी सभासदांच्या गरजेचा विचार करावा.आज आम्हाला खायला नसताना संस्थेने का विचार करू नये, असा सवाल ते केविलवाणी स्वरात काढत आहेत. या घडीला तरी संस्थेच्या नफ्यातील अथवा बिनव्याजी किमान रुपये २०,०००/ रक्कम सभासदांना द्यावी, अशी संस्थेत दूध घालणाऱ्या सभासदांची मागणी आहे. आज बऱ्याच संस्थेत कोरोनाअभावी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन होत असल्याने व काही संस्थेच्या सभा कागदोपत्रीच झाल्याने सभासदांना आपले दुःखणे कसे मांडायचे हेच कळत नसून संस्थेचे कारभार संचालकावरच अवलंबून असल्याने आजघडीला सभासदांना न्याय मिळत नसल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. जनावरांचे भाव गगनाला भिडले असून ती खरेदी करण्यासाठी फार मोठी आर्थिक अडचण भासत आहे. जनावरांचे खाद्य ,औषधे,चारापाणी यावर होणारा खर्च यातून सभासदांच्या हातात दुधाच्या वजाबाकीची मिळत असलेली बिलाची पावती या सर्वांचा ताळमेळ बसत नसल्यानेच सध्यातरी सर्व दूधसंस्थानी दूध उत्पादक सभासदांना आर्थिक मदत करावी, या मागणीसाठी जोर धरला आहे.