पार्ले येथील पाणंद रस्ते अडवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 19:04 IST2020-12-15T19:01:30+5:302020-12-15T19:04:57+5:30
:पार्ले (ता. चंदगड) येथे पूर्वापार चालत आलेल्या वहिवाटीखालील पांणद रस्ते अडवणूक करणाऱ्या शेतकऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी तहसिलदार विनोद रणवरे यांच्याकडे ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे.

पार्ले येथील पाणंद रस्ते अडवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाईची मागणी
चंदगड :पार्ले (ता. चंदगड) येथे पूर्वापार चालत आलेल्या वहिवाटीखालील पांणद रस्ते अडवणूक करणाऱ्या शेतकऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी तहसिलदार विनोद रणवरे यांच्याकडे ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे.
निवेदनात, गट नं ५१/१ मधील जमिनीतून शिवारातील, वाडी, वस्तीवर जाण्या-येण्यासाठी पाणंद रस्त्याची नोंद आहे. पण, या पाणंद रस्त्यावर अतिक्रमण करून हे पाणंद अडविण्यात आले आहेत. तसेच याच जमिनीतून पार्ले गावाला पाणी पुरवठा करणारी नळपाणी योजना कार्यान्वित आहे.
या नळपाणी योजनेचीही या शेतकऱ्यांनी दोन-तीन वेळा मोडतोड केली आहे. नळपाणी योजना व पाणंद रस्ते दुरूस्त करून मिळावेत, अशी मागणी ग्रामसभेच्या ठरावाद्वारे पंचायत समितीकडे केली. त्यानुसार नळपाणी व रस्तेही दुरूस्ती केलेली आहेत. मात्र, गट नं. ५१/१ च्या जमीन मालकांनी जाण्या-येण्याचा गावकऱ्यांचा हक्कसंबंध डावलून व निव्वळ त्रास देण्याच्या हेतूने चंदगड न्यायालयात दावा दाखल केला आहे.
गट. नं ५१/१ मध्ये झालेल्या ग्रा.पं. नोंदीच्या रस्त्याबरोबर सदर क्षेत्रातून जाणारे व अन्य पाणंद रस्ते व गावाला जोडणारे रस्ते दुरुस्त करुन मिळावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनावर, तंटामुक्त अध्यक्ष गोविंद गावडे, महादेव मयेकर, दत्ता फाटक, मारूती कांबळे, लक्ष्मण गावडे, जीवणू गावडे, संभाजी गावडे, विठोबा मयेकर, तुकाराम गावडे, विठ्ठल गावडे, रामू देवळी, अजय कांबळे, अशोक सुतार, विठ्ठल जानकर, शंकर मयेकर आदीसह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्याआहेत.