शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
9
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
10
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
11
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
12
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
13
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
14
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
15
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
16
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
17
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
18
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
19
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
20
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
Daily Top 2Weekly Top 5

दबाव झुगारुन अतिक्रमण हटवा

By admin | Updated: March 10, 2017 23:08 IST

स्थायी समिती : कारवाई सुरूच ठेवण्यावर सर्व सदस्य ठाम

कोल्हापूर : शहरातील अतिक्रमण काढायला गेल्यावर कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्यानंतर त्यामध्ये पदाधिकारी, नगरसेवकांनी केलेल्या हस्तक्षेपाची घटना ताजी असतानाच पदाधिकाऱ्यांचा दबाव झुगारून अतिक्रमण हटविण्याची जोरदार मागणी शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती डॉ. संदीप नेजदार होते. शहरातील वाढत्या अतिक्रमणाचा मुद्दा नीलेश देसाई, आशिष ढवळे, उमा इंगळे, सत्यजित कदम यांनी उपस्थित करून प्रशासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले. ताराबाई पार्क, नागाळा पार्क, शिवाजी पार्क, कदमवाडी रोड, आदी परिसरांत नवीन हातगाड्या, टपऱ्या उभ्या राहू लागल्या आहेत. या परिसरात अतिक्रमणे वाढत आहेत. त्यामुळे वेळीच यावर कारवाई होणे गरजेचे आहे तसेच मध्यवर्ती बसस्थानक परिसरातही हातगाड्या व केबिनची संख्या वाढत आहे. या परिसरात तातडीने अतिक्रमणविरोधी मोहीम राबवून कारवाई करावी. कोणा नगरसेवक- पदाधिकाऱ्यांचे फोन आले, अशी कारणे सांगू नका, अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाला दम भरला. बी. टी. कॉलेज परिसरातील फेरीवाल्यांकडे बायोमेट्रिक कार्ड नाहीत. काही फेरीवाल्यांकडे दोन-दोन बायोमेट्रिक कार्ड आहेत. ती जप्त करावीत. फूलविक्रेत्यांनी पुन्हा अतिक्रमण केले असून तेथे केबिन उभारल्या आहेत. तेथे अनधिकृत केबिनच जास्त झाल्या असल्याची बाबही यावेळी निदर्शनास आणून देण्यात आली. कारवाई करायला गेल्यावर कोणा पदाधिकाऱ्यांचे फोन आले तर घेऊ नका. मोबाईल बंद करा, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली. ई वॉर्डातील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, राजारामपुरी परिसरातील पाण्याच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरत नसल्याची तक्रार उमा इंगळे, आशिष ढवळे यांनी सभेत केली. त्यावेळी टाक्या व्यवस्थित भरत नाहीत हे बरोबर आहे. मुख्य व्हॉल्व्ह वेळेत बंद करून पाणी पुढे देता येणे शक्य आहे. येत्या दोन दिवसांत पाणी नियोजनात बदल केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या विविध विषयांवरील चर्चेत मनीषा कुंभार, कविता माने, प्रतिज्ञे निल्ले, आदींनी भाग घेतला. (प्रतिनिधी) जैव कचऱ्यासाठी पर्यायी यंत्रणा उभी कराजैव कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ‘नेचर इन निड’कडे ठेका दिला आहे; या कंपनीच्या कामातील तक्रारीमुळे त्यांना टर्मिनेट करण्यात आले आहे. आता त्यांच्याकडे जैव कचरा न देता महापालिका प्रशासनाने पर्यायी यंत्रणा उभी करावी, अशी मागणी स्थायी सभेत करण्यात आली. या कंपनीकडून ४४ लाख २८ हजार रुपये येणे आहेत. त्याच्या वसुलीसाठी आतापर्यंत दोन नोटिसा देण्यात आल्या आहेत. आता शेवटची नोटीस देण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले.