‘ओंकार’ हत्ती 'वनतारा'मध्ये पाठविण्याबाबत आज निर्णय, कोल्हापूर खंडपीठात सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 13:47 IST2025-11-12T13:47:17+5:302025-11-12T13:47:40+5:30
कोल्हापूर : ''ओंकार'' हत्तीला गुजरातमधील ''वनतारा'' सेंटरमध्ये पाठविण्यासंदर्भातील याचिकेवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचसमोर सुनावणी पार ...

‘ओंकार’ हत्ती 'वनतारा'मध्ये पाठविण्याबाबत आज निर्णय, कोल्हापूर खंडपीठात सुनावणी
कोल्हापूर : ''ओंकार'' हत्तीला गुजरातमधील ''वनतारा'' सेंटरमध्ये पाठविण्यासंदर्भातील याचिकेवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर येथील सर्किट बेंचसमोर सुनावणी पार पडली. ४९ मिनिटांच्या या मुदत पूर्व सुनावणीत न्यायमूर्ती कर्णिक यांनी बुधवारी सकाळपर्यंत शपथपत्र सादर करण्याचे वनविभागाला निर्देश दिले आहेत. न्यायालय आपला अंतिम निर्णय आज, बुधवारी देणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कोल्हापूर सीमेजवळ फिरत असलेल्या ‘ओंकार’ हत्तीसंदर्भातील जनहित याचिकेची सुनावणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक आणि न्यायमूर्ती अजित बी. कडेठणकर यांच्यासमोर झाली.