भूविकास जागेचा निर्णय देवस्थानच्या बैठकीत :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:58 IST2021-02-05T06:58:18+5:302021-02-05T06:58:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने दोन वर्षांपूर्वी भूविकास बँकेच्या जागेसाठीचा प्रस्ताव दिला होता. निंबाळकर ...

भूविकास जागेचा निर्णय देवस्थानच्या बैठकीत :
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने दोन वर्षांपूर्वी भूविकास बँकेच्या जागेसाठीचा प्रस्ताव दिला होता. निंबाळकर यांच्या जागेचा विषयदेखील आम्ही न्याय व विधी खात्याच्या परवानगीसाठी पाठवला आहे. त्यामुळे भूविकास बँकेच्या जागेसंदर्भात समितीच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अध्यक्ष महेश जाधव यांनी बुधवारी दिली.
मागील महिन्यात भूविकास बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती. यात देवस्थान समितीने यापूर्वी इमारतीची मागणी केली होती. बँकेच्या कर्मचाऱ्यांची देणी भागवण्यासाठी त्यांना जागा विकण्यात यावी, यासाठी ते तयार असतील तर तसा प्रस्ताव त्यांना द्यायला सांगा, असे सुचवण्यात आले होते. अखेर याबाबत मंगळवारी मुंबईत झालेल्या सहकार विभागाच्या बैठकीत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी समितीला यासंदर्भात सकारात्मक फेरप्रस्ताव सादर करावा, अशी सूचना केली. समितीने हा प्रस्ताव शिवाजी पेठेतील कार्यालयाच्या नूतनीकरणापूर्वी दिला होता. आमच्यापुढे निंबाळकर यांची जागा आणि भूविकास बँक अशा दोन जागा आहेत. पण, त्याबाबतचा निर्णय समिती सदस्यांशी चर्चा केल्यानंतर घेतला जाईल, असे अध्यक्ष जाधव यांनी सांगितले.
--