शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

पूरग्रस्त सामाईक क्षेत्र सभासदांची कर्ज माफी व्हावी: शिवसेनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 1:24 PM

कोल्हापूर : शासनाने लेखापरीक्षकांना पूरग्रस्त भागातील सामाईक क्षेत्राचे लेखापरीक्षण कोणत्या प्रकारे करावे याबाबत सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम ...

ठळक मुद्देपूरग्रस्त सामाईक क्षेत्र सभासदांची कर्ज माफी व्हावी शिवसेनेच्या शिष्टमंडळाची मागणी

कोल्हापूर : शासनाने लेखापरीक्षकांना पूरग्रस्त भागातील सामाईक क्षेत्राचे लेखापरीक्षण कोणत्या प्रकारे करावे याबाबत सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तरी क. म. पत्रकाप्रमाणे कर्जपुरवठा केलेल्या संस्थेचे लेखापरीक्षण करून कर्जमाफी त्वरीत मिळावी, अशी मागणी मंगळवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) अमर शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. जुलै-आॅगस्ट २०१९ मध्ये अतिवृष्टीने महापूर येऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाने पूरग्रस्त संस्थेने दिलेल्या कर्जास कर्जमाफी जाहीर केली आहे. परंतु ज्यांचा सामाईक क्षेत्राचा ८ अ स्वतंत्र आहे, अशा सभासदांचे कर्जमाफीचे लेखापरीक्षण करण्यात आलेले आहे.शासनामार्फत करण्यात आलेल्या पंचनाम्यामधील सामाईक क्षेत्राचे लेखापरीक्षण करण्यात आलेले नाही. शासनाने लेखापरीक्षकांना सामाईक क्षेत्राचे लेखापरीक्षण कोणत्या प्रकारे करावे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तरी क. म. पत्रकाप्रमाणे कर्ज पुरवठा केलेल्या संस्थेचे लेखापरीक्षण करून कर्जमाफी त्वरीत मिळावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.शिष्टमंडळात शहरप्रमुख शिवाजी जाधव, राजू यादव, विराज पाटील, अवधूत साळोखे, तानाजी आंग्रे, संजय स्वामी, अशोक जाधव, कृष्णात पाटील, आदींचा समावेश होता. 

 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर