शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

पतंगाच्या नादात मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By admin | Updated: November 1, 2015 00:56 IST

विक्रमनगर परिसरात घटना

इचलकरंजी : येथील विक्रमनगर परिसरात उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला अडकलेला पतंग काढण्याच्या प्रयत्नात शालेय विद्यार्थ्यांचा विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तुषार संतोष सोनवणे (वय १३) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली. याबाबत गावभाग पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. दरम्यान, वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा खंडीत करून बालकाचा मृतदेह खाली उतरविला. याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, विक्रमनगर परिसरातील मुरदंडे मळ्यात सुशीला सोनवणे आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात. त्यांचा १३ वर्षांचा शाळकरी मुलगा तुषार याला शनिवारी दुपारी परिसरातील विष्णू राजाराम यांच्या यंत्रमाग कारखान्यावर असलेल्या विद्युत वाहिनीला अडकलेला पतंग दिसला. हा पतंग काढण्याचा मोह त्याला आवरला नाही. तो कारखान्याच्या स्लॅबवर चढला आणि उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीत अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न करू लागला. यावेळी त्या वाहिनीचा त्याला जबर धक्का बसून तो वाहिनीला चिकटला. यावेळी वीज मंडळाला माहिती दिल्यानंतर कर्मचारीही तातडीने घटनास्थळी दाखल झाले.तुषारला खाली उतरविण्यात आले व उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.