Kolhapur: पाचगावच्या तरुणाचा मृतदेह भोगावती नदी पात्रात सापडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 15:44 IST2023-11-08T15:38:54+5:302023-11-08T15:44:47+5:30
पत्नीला त्रास देऊ नका तिला सांभाळा, मोबाईलवर व्हाईस रेकाँर्ड करून मॅसेज कुटुंबातील ग्रुपवर टाकला; अन्

Kolhapur: पाचगावच्या तरुणाचा मृतदेह भोगावती नदी पात्रात सापडला
प्रकाश पाटील
कोपार्डे : भोगावती नदी पात्रात पाचगाव येथील एका तरुणाने उडी टाकून काल, मंगळवारी आत्महत्या केली. आज, बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह दोनवडे हद्दीत सापडला. संतोष बाळासो गाडगीळ (वय ३५, रा. पाचगाव) असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे.
घटनास्थळावरून व नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी एक तरुण बालिंगा पुला जवळ भोगावती नदीवरील दोनवडी हद्दीत नदीकाठावरून फिरत असल्याचे दिसत होता. तो पाच नंतर अचानक तो गायब झाला होता. त्याची मोटरसायकल व मोबाईल नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर होती. यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत होता. रात्री उशिरापर्यंत त्याच्या नातेवाईकांनी उसाच्या शेतातून व नदी काठावर व पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तो सापडला नाही.
बुधवारी सकाळपासून त्यांच्या नातेवाईक, जीवरक्षक उदय निंबाळकर व आपत्ती व्यवस्थापनच्या साहाय्याने पुन्हा पाण्यात शोधून मोहीम सुरू केली. संतोषचे पाय नायलॉनच्या दोरीने बांधलेले होते. तर एक हात याच दोरीच्या साहाय्याने बांधून ही दोरी मानेभोवती गुंडाळली होती. घटनास्थळावरून ही आत्महत्या असल्याची चर्चा असल्याने संशय दूर झाला आहे. घटनास्थळी करवीर पोलिसांनी येऊन पंचनामा केला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, आई-वडील व एक भाऊ असा परिवार आहे.
मोबाईलवर व्हाईस मँसेज
संतोषने दुपारी एक दोनच्या दरम्यान आपल्या मोबाईलवर व्हाईस रेकाँर्ड करून मॅसेज आपल्या कुटुंबातील ग्रुपवर टाकला होता. यात माझ्या पत्नीला त्रास देऊ नका तिला सांभाळा असे रेकाँर्ड करून पाठवल्याचे संतोषच्या चुलत्याने सांगितले.
संतोषचे लग्न आठ ते दहा वर्षांपूर्वी झाले होते. बुधवारी तो पत्नीला दवाखान्यात घेऊन गेला होता. दुपारी तो घरी आला आणि मोटरसायकल घेऊन बालिंगा येथे मोटरसायकलवरून भोगावती नदीच्या बालिंगा पुलाजवळ आला असावा. येथेच व्हाईस रेकाँर्ड करून फँमिली ग्रुपवर टाकले. त्यानंतर नातेवाईक मोबाईल लोकेशनवर भोगावती नदीवर आले पण गाडी सापडली पण संतोष दिसला नाही. बुधवारी भोगावतीत त्याचा मृतदेह सापडला.