शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

‘दौलत’च्या थकबाकीसाठी ‘पाटबंधारे’ची जिल्हा बँकेकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 11:39 AM

हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतलेल्या एकाही कंपनीने पाणीपट्टी न भरल्याने थकबाकीचा आकडा ९७ लाखांवर गेला आहे. या रकमेच्या वसुलीसाठी कोल्हापूर पाटबंधारे परिमंडळाच्या दक्षिण विभागाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे धाव घेतली.

ठळक मुद्दे‘दौलत’च्या थकबाकीसाठी ‘पाटबंधारे’ची जिल्हा बँकेकडे धावकारखान्याकडे २००५ पासून पाणीपट्टी थकीत: ९७ लाख २४ हजारांची रक्कम

कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतलेल्या एकाही कंपनीने पाणीपट्टी न भरल्याने थकबाकीचा आकडा ९७ लाखांवर गेला आहे. या रकमेच्या वसुलीसाठी कोल्हापूर पाटबंधारे परिमंडळाच्या दक्षिण विभागाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे धाव घेतली.

ही रक्कम या कंपन्यांकडून वसूल करून द्यावी अथवा कंपनीसोबतच्या करारात पाटबंधारेच्या थकबाकीचा आकडा समाविष्ट करून ती रक्कम जमा करावी, अशी विनंती करणारे पत्रच ‘पाटबंधारे’च्या उपअभियंत्यांनी बँक प्रशासनाला दिले आहे.दौलत कारखाना न्यूट्रियंट्स कंपनीने भाडेकराराने चालविण्यास घेतला होता. चालविण्यास घेण्यापूर्वी कारखान्याच्या इतर थकबाकीपैकी २००५ पासूनची ७५ लाख २९ हजार रुपये इतकी बिगरसिंचन पाणीपट्टी थकीत होती. याबाबत जलसंपदा विभागाकडून वारंवार सूचनाही दिल्या, पण कारखाना प्रशासनाने ती रक्कम भरली नव्हती.

दरम्यानच्या २०१६ पासून न्यूट्रियंट्स कंपनीने हा कारखाना भाडेतत्त्वाने चालविण्यास घेतला. कंपनीच्या कालावधीत २९ लाख ९५ हजारांची पाणीपट्टी थकीत राहिली. कंपनीने ही रक्कम भरली नसल्याने हा थकीत आकडा ९७ लाख २४ हजारांवर पोहोचला आहे.वास्तविक कारखाना भाडेकराराने देतानाच करारपत्रात इतर थकबाकीप्रमाणे पाणीपट्टी थकीत रक्कम समाविष्ट करणे गरजेचे होते; पण बँकेने ते केलेले नव्हते. त्यामुळे ही रक्कम भरण्यास न्यूट्रियंट्स कंपनीने नकार दिल्याने थकबाकीपैकी एक रुपयाही वसूल होऊ शकला नाही.

आता हा कारखाना अथर्व शुगर्स या नव्या कंपनीकडे चालविण्यास दिला जाणार आहे. त्यांच्या सोबतच्या करारातही याचा समावेश करणे आवश्यक असल्याचे पत्र पाटबंधारे कार्यालयाने बँकेकडे पाठविले आहे.

कंपनीकडून शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून सिंचनासाठी म्हणून कपात केलेली सात लाख ५० हजारांची रक्कम ‘पाटबंधारे’कडे भरणे आवश्यक होते; पण कंपनीने हे भरलेले नाहीत, याकडेही पत्राद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे.

तांबाळे कारखान्याकडे ४८ लाखांची पाणीपट्टी थकीततांबाळे येथील इंदिरा सहकारी साखर कारखान्याचीही ४८ लाख ३२ हजारांची पाणीपट्टी गेल्या १५ वर्षांपासून थकलेली आहे. अथणी शुगर्सने हा कारखाना भाडेकराराने चालवण्यास घेतला आहे. त्यांनीदेखील ही मागील थकीत रक्कम भरलेली नाही. यासंदर्भात पाटबंधारे कार्यालयाने प्रादेशिक साखर सहसंचालक व जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्र पाठवून ऊस बिलातून रक्कम वसूल करून द्यावी अशी विनंती केली आहे. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेWaterपाणीkolhapurकोल्हापूर