कोल्हापुरातून घडणार हिरवाईने नटलेल्या अखंड भारताचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:58 IST2021-02-05T06:58:11+5:302021-02-05T06:58:11+5:30

कोल्हापूर : देशातील प्रत्येक राज्याची खास ओळख असलेला एक वृक्ष आता कोल्हापुरात रुजलेला, फळलेला पाहायला मिळणार आहे. वृक्ष संवर्धनासाठी ...

Darshan of green India will take place from Kolhapur | कोल्हापुरातून घडणार हिरवाईने नटलेल्या अखंड भारताचे दर्शन

कोल्हापुरातून घडणार हिरवाईने नटलेल्या अखंड भारताचे दर्शन

कोल्हापूर : देशातील प्रत्येक राज्याची खास ओळख असलेला एक वृक्ष आता कोल्हापुरात रुजलेला, फळलेला पाहायला मिळणार आहे. वृक्ष संवर्धनासाठी काम करणाऱ्या कोल्हापुरातील वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेनने यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कोल्हापुरातील टाकाळा माळी कॉलनी येथे विकसित होत असलेल्या उद्यानात ३४ राज्यांतील वृक्षांचे संवर्धन होणार आहे. हिरवाईतून नटलेल्या अखंड भारताचे दर्शन कोल्हापुरातून होईल, असा या उपक्रमाचा उद्देश आहे.

प्रजासत्ताक दिन म्हटले की, झेंडावंदन आणि जिलेबीच्या पलीकडे काहीचे विश्व नसते; पण याच दिवशी प्रत्येक राज्याचे स्वतंत्र अस्तित्व, वैशिष्ट्य मान्य केले गेले, वेगळी ओळख दिली गेली याकडे दुर्लक्ष होते. नेमका हाच धागा पकडत कोल्हापुरात वृक्ष संवर्धनासाठी नानाविध उपक्रम सातत्याने राबवणाऱ्या वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेनने प्रजासत्ताक दिनाला पर्यावरणीय आणि अखंडतेचे स्वरूप देण्याचा विचार पुढे आणला. राज्यातील प्रमुख वृक्ष कोणते, ते कोठे उपलब्ध होईल यासाठी अमोल बुढ्डे, सतीश कारंडे, परिताष उरकुटे, अक्षय कांबळे, साजीद शेख, विद्या पात्रे, सविता साळोखे, अनुज वाघरे, उदय जाधव, सतीश पावार, अभिजीत गडकरी ही टीम कामाला लागली.

टाकाळा माळी कॉलनी येथील महापालिकेचे उद्यान विकसित होत असलेल्या पाच हजार स्क्वेअर फूट जागेत प्रत्येक राज्याचा एक वृक्ष याप्रमाणे २२ राज्यांच्या वृक्षांची लागण करण्याचे नियोजन केले गेले. प्रजासत्ताकदिनी मंगळवारी सकाळी हे वृक्षारोपण होणार असल्याने गेले आठ दिवस ही सर्व टीम राबत आहे. खड्डे काढण्यापासून ते बॅनर तयार करणे, राज्यातील वृक्ष विविध नर्सरीमधून जमवणे हे काम सुरू आहे. रविवारी दिवसभर ही सर्व टीम या वृक्षारोपणाच्या जागेवर राबत होती.

राज्य लावले जाणारे झाड

आंध्र प्रदेश कडुनिंब

अरुणाचल प्रदेश होलाँग

बिहार पिंपळ

छत्तीसगड साल

गोवा नारळ

गुजरात वड

हरियाणा पिंपळ

हिमाचल प्रदेश देवदार

झारखंड साल

कर्नाटक चंदन

केरळ नारळ

मध्यप्रदेश वड

महाराष्ट्र आंबा

मणीपूर महानिंब

मेघालय शिवण

मिझोराम नागकेशर

नागालॅण्ड अल्डर

ओडिसा उंबर

पंजाब शिसम

राजस्थान शमी

सिक्कीम रोडेन्ड्रो

तामिळनाडू पाम

तेलंगणा जाम्मी

त्रिपुरा अगर

उत्तर प्रदेश अशोक

पश्चिम बंगाल सातवीन

चंदीगड आंबा

काश्मीर चीनार

पाँडेचरी बेलफळ

Web Title: Darshan of green India will take place from Kolhapur