डॉल्बीच्या ठेक्यावर ट्रॅक्टरवर नाचवल्या नृत्यांगना, ऊसतोडणी कामगारांचा धिंगाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 01:20 PM2021-03-12T13:20:39+5:302021-03-12T13:30:44+5:30

danceSugerfactoryKolhapur- साखर कारखानाच्या हंगामाची सांगता करताना कांडगाव परिसरातील ट्रॅक्टर चालक आणि ऊसतोडकामगारांनी काढलेल्या मिरवणुकीत डॉल्बीच्या ठेक्यावर नृत्यांगना नाचवत कोल्हापूर-राधानगरी रोडवर धिंगाणा घातला. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी घडला. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली. या प्रकारामुळे बाजारपेठेतील महिलांना शरमेने मान खाली घालावी लागली.

Dancers dancing on a tractor on a Dolby contract, a throng of sugarcane workers | डॉल्बीच्या ठेक्यावर ट्रॅक्टरवर नाचवल्या नृत्यांगना, ऊसतोडणी कामगारांचा धिंगाणा

डॉल्बीच्या ठेक्यावर ट्रॅक्टरवर नाचवल्या नृत्यांगना, ऊसतोडणी कामगारांचा धिंगाणा

googlenewsNext
ठळक मुद्देडॉल्बीच्या ठेक्यावर ट्रॅक्टरवर नाचवल्या नृत्यांगनाऊसतोडणी कामगारांचा धिंगाणा

सडोली (खालसा)/कोल्हापूर  : साखर कारखानाच्या हंगामाची सांगता करताना कांडगाव परिसरातील ट्रॅक्टर चालक आणि ऊसतोडकामगारांनी काढलेल्या मिरवणुकीत डॉल्बीच्या ठेक्यावर नृत्यांगना नाचवत कोल्हापूर-राधानगरी रोडवर धिंगाणा घातला. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी घडला. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली. या प्रकारामुळे बाजारपेठेतील महिलांना शरमेने मान खाली घालावी लागली.

 कोल्हापूर-राधानगरी राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते, पण याचा कुठलाही विचार न करता, कोणतीही परवानगी न घेता सायंकाळी पाचच्या सुमारास कांडगाव (ता.करवीर) येथून ही मिरवणूक काढण्यात आली. तब्बल दोन तास ही मिरवणूक सुरु होती.

हळदीच्या मुख्य बस थांब्यावर मुख्य रस्त्यातच ट्रॅक्टर लावून डॉल्बीच्या मागे असणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये दोन नृत्यांगना अश्लील हावभाव करत नृत्य करत होत्या. तर दारूच्या नशेत असलेले अनेक ऊसतोड कामगार, युवक, ट्रॅक्टर चालक, दहा ते पंधरा वयोगटातील अल्पवयीन मुलांनीही डॉल्बीचा ठेका धरला. या सर्व प्रकाराबाबत संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महिला व सामान्यांकडून केली जात आहे.

 

Web Title: Dancers dancing on a tractor on a Dolby contract, a throng of sugarcane workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.