Kolhapur News: ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर 'दाजीपूर अभयारण्य' दोन दिवस बंद राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 15:48 IST2022-12-27T14:35:34+5:302022-12-27T15:48:34+5:30
२ जानेवारी पासून अभयारण्य पर्यटनासाठी पुन्हा खुले करण्यात येणार

Kolhapur News: ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर 'दाजीपूर अभयारण्य' दोन दिवस बंद राहणार
गौरव सांगावकर
राधानगरी : ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राधानगरी दाजीपूर अभयारण्य ३१ डिसेंबर व १ जानेवारी दोन दिवस पर्यटनासाठी बंद राहणार आहे. अशी माहिती दाजीपूर अभयारण्य वनक्षेत्रपाल अजित माळी यांनी दिली. २ जानेवारी पासून अभयारण्य पर्यटनासाठी पुन्हा खुले करण्यात येणार आहे.
दाजीपूर अभयारण्य तसेच राधानगरी परिसरातील राऊतवाडी, हसणे, करिवडे या सारख्या अनेक स्थळांना हौशी पर्यटक भेट देतात. ३१ डिसेंबरचा बेत आखून पर्यटकस्थळी मद्यपान करून पार्टी तसेच हुल्लडबाजी केली जाते. यामुळे पर्यावरणाला, वन्यजीवांना तसेच त्यांच्या आश्रयस्थळांना धोका पोहोचतो. अभयारण्य क्षेत्रात अनेक ठिकाणी जेवणावळीसाठी चुली पेटवल्या जातात, त्यामुळे वनवा लागण्याचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे पर्यटकांना दाजीपूर अभयारण्यात येण्यास दोन दिवस सक्त मनाई करण्यात आली आहे.
हुल्लडबाजांना रोखण्यासाठी प्रशासन सज्ज
नववर्षाच्या जल्लोषात काही अतिउत्साही पर्यटकांकडून हुल्लडबाजीचे प्रकार घडतात. अशा हुल्लडबाजांना रोखण्यासाठी वनविभाग व पोलिस प्रशासन सज्ज आहे.