शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

‘दादा’ मंडळांचा डॉल्बीला फाटा

By admin | Updated: September 4, 2016 01:26 IST

ध्वनिप्रदूषणमुक्तीचा निर्धार : दयावान, हिंदवी, दिलबहार, क्रांती बॉईज, आदींचा समावेश

कोल्हापूर : गणेशोत्सव काळात जिल्हा पोलिस प्रशासनाने डॉल्बीमुक्तीचे आवाहन केले होते. त्यास कोल्हापुरातील दादा अर्थात दरवर्षी मिरवणुकीत डॉल्बी लावणाऱ्या मंडळांनीही प्रतिसाद दिला असून, डॉल्बी लावायचा नाही असा निर्धार केला आहे. यामध्ये दयावान, हिंदवी, दिलबहार, क्रांती बॉईज या मंडळांचा समावेश आहे.शहरासह जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषणामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जाणीव करून देण्याचे काम अनेक संस्था व पोलिस प्रशासन करून देत आहे. याच पार्श्वभूमीवर मंडळांच्या कार्यकर्त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. याकरिता जुना राजवाडा, राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी विविध मंडळांच्या प्रतिनिधींना बोलावून त्यांना डॉल्बीमुळे मानवी शरीरावर होणारे परिणाम आणि डॉल्बीच्या आवाजाची मर्यादा ओलांडल्यानंतर केली जाणारी कायदेशीर कारवाई याबाबत माहिती देत आहेत. स्वत: विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, अधीक्षक प्रदीप देशपांडे मंडळांच्या बैठकांमध्ये डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करीत आहेत. या आवाहनास प्रतिसाद म्हणून दिलबहार तालीम मंडळ, दयावान गु्रप, हिंदवी स्पोर्टस क्लब, शिवाजी पेठेतील बी.जी.एम. स्पोर्टस, महाकाली तालीम मंडळ, खंडोबा तालीम मंडळ, अवचितपीर तालीम मंडळ, सणगर गल्ली तालीम मंडळ, बोडके तालीम मंडळ, संयुक्त शिवाजी तरुण मंडळ, न्यू गुजरी मित्र मंडळ, तटाकडील तालीम मंडळ, आदी नावाजलेल्या मंडळांनी मिरवणुकीत डॉल्बी न लावण्याचा निर्धार केला आहे. (प्रतिनिधी)असाही निर्धार दरवर्षी मिरवणूक मार्गावर सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत मिरजकर तिकटी ते महाद्वार रोड या मार्गावर आपलेच मंडळ असावे असा अट्टाहास करणारी अनेक मंडळे आहेत. या मंडळांचे कार्यकर्ते म्हणतात, ‘पदाधिकारी काहीही म्हणू देत आम्ही मात्र ‘दोन बेस दोन टॉप’वर ठाम आहोत.’ध्वनिप्रदूषणाचा विचार करून यंदा आमच्या गु्रपने डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार केला आहे. स्पेशल लाईट इफेक्टचा देखावा भाविकांसमोर सादर करू.- प्रताप देसाई, अध्यक्ष दयावान गु्रप पोलिस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करू. - नामदेव लोहार, अध्यक्ष, क्रांती बॉईजपोलिस प्रशासनाच्या नियमांना अधीन राहून, स्टेरिओ साऊंड सिस्टीमचा वापर करून आम्ही यंदा डॉल्बीच्या भिंतींना फाटा देऊ. - अमोल माने, पदाधिकारी, हिंदवी स्पोर्टस