शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

माणगाव येथे डी. ए. पाटील यांचा पुतळा उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, रुकडी माणगाव : माणगाव हायस्कूलच्या प्रांग॔णात स्व. प्राचार्य दादा पाटील यांचा पुतळा उभारण्यास मान्यता देत ...

लोकमत न्यूज नेटवर्क, रुकडी माणगाव : माणगाव हायस्कूलच्या प्रांग॔णात स्व. प्राचार्य दादा पाटील यांचा पुतळा उभारण्यास मान्यता देत असून, विवेकानंद संस्थेचा सुगंध दरवळण्याकरिता त्यांनी केलेले कार्य मैलिक आहे असे प्रतिपादन विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. अभयकुमार साळुंखे यांनी केले. माणगाव, ता. हातकणंगले येथे प्राचार्य दादासो पाटील उर्फ डी. ए. पाटील यांच्या शोकसभेत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे म्हणाले की, काही व्यक्ती हे कर्तबगार असतात, प्राचार्य दादा पाटील हे त्यापैकी एक होते.

विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी आजीव सेवक टी. बी. पाटील यांनी प्राचार्य डी. ए. पाटील यांच्यामुळे माणगाव गाव हे शंभर टक्के साक्षर असून, माणगाव हे शिक्षकांचे गाव म्हणून ओळखले जाते. ते केवळ डी. ए. पाटील यांच्यामुळेच.

सरपंच राजू मगदूम म्हणाले की, प्राचार्य डी. ए. पाटील यांच्यामुळे गावची प्रगती झाली असून, विवेकानंद शिक्षण संस्थेचे नाव सातासमुद्रापार नेण्याचे काम त्यांनी केले. त्यांचा यथोचित सन्मान होण्यासाठी माणगाव हायस्कूलच्या प्रांग॔णात पुतळा उभारण्यास ग्राम पंचायत, माणगाव संपूर्ण सहकार्य करेल.

माजी मुख्याध्यापक आय. वाय. मुल्ला यांनी प्राचार्य डी. ए. पाटील हे माणगावचे भूषण होते, त्यांनी माणगावचे नाव मोठे केले असून पूज्य बापूजींचे आवडते विद्यार्थी होते, असे प्रतिपादन केले. कर्मवीर मल्टिस्टेटचे माजी चेअरमन सुकुमार पाटील यांनी माणगाव गावच्या वतीने श्रद्धांजली वाहिली.

दरम्यान, माजी राज्यपाल डी. वाय. पाटील यांनी प्राचार्य डी. ए. पाटील यांचे चिरंजीव रवींद्र पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून माजी राज्यमंत्री प्रकाश आवाडे, जि. प. सदस्य राहुल आवाडे, शुभांगी गावडे, जि. प. सदस्य वंदना मगदूम, युवराज भोसले यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन शोक व्यक्त केला.