लैंगिक चाळ्यांप्रकरणी महिलेसह मुलीवर गुन्हा, शाहूपुरी पोलिसांत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 16:40 IST2020-08-13T16:36:16+5:302020-08-13T16:40:35+5:30
लहान मुलांना घरात बोलावून त्यांच्याशी लैंगिक चाळे करीत असल्याचा आरोप पालकांनी कसबा बावड्यातील एका महिलेसह तिच्या मुलीवर केला.

लैंगिक चाळ्यांप्रकरणी महिलेसह मुलीवर गुन्हा, शाहूपुरी पोलिसांत तक्रार
ठळक मुद्दे लैंगिक चाळ्यांप्रकरणी महिलेसह मुलीवर गुन्हा, शाहूपुरी पोलिसांत तक्रार पीडित मुलांच्या पालकांची पोलिसांत धाव
कोल्हापूर : लहान मुलांना घरात बोलावून त्यांच्याशी लैंगिक चाळे करीत असल्याचा आरोप पालकांनी कसबा बावड्यातील एका महिलेसह तिच्या मुलीवर केला. पालकांच्या तक्रारीनुसार त्या दोघींविरोधात शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
लहान मुलांना खाऊचे आमिष दाखवून घरात बोलावून त्यांच्याशी लैंगिक चाळे करीत असल्याचा आरोप पीडित मुलांच्या पालकांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात केला. मे महिन्यापासून हा प्रकार सुरू होता.
या प्रकरणाचा जाब विचारल्याबद्दल त्या महिलेने पीडित मुलांच्या पालकांनाही शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत आणखी दोन तक्रारी दाखल होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.