शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भारताकडून न्यूझीलंडची धुळधाण, कोल्हापुरातील शिवाजी चौकात जल्लोषाचा 'रंगोत्सव'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 11:51 IST

'भारत माता की जय', 'वंदे मातरम्'च्या घोषणा देत जल्लोष

कोल्हापूर : न्यूझीलंडची धुळधाण करीत टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतच विश्ववीर ठरल्यानंतर कोल्हापुरातील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात क्रिकेटप्रेमींनी रविवारी जल्लाेष करत रंगपंचमीचा आनंद द्विगुणित केला. या विजयानंतर तरुणाईने तिरंगा फडकवत, फटाक्यांची आतषबाजी करत आणि 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्'च्या घोषणा देत जल्लोष केला.कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, जिथे क्रिकेट विजयानंतर नेहमीच गर्दी जमते. विजय नजरेच्या टप्प्यात येताच साडेदहा वाजल्यापासूनच क्रिकेटचे चाहते शिवाजी चौकात पोहोचले आणि तिरंगा फडकवत, फटाक्यांची आतषबाजी करत आणि 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्'च्या घोषणा देत जल्लोष केला. रात्री उशिरापर्यंत हा जल्लोष सुरू होता. दरम्यान, शहरात अनेक ठिकाणी हॉटेल्स, तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ध्वनी यंत्रणा (साउंड सिस्टीम) लावून नृत्य करत जल्लोष केला.फटाक्यांची आतषबाजी करत मध्यरात्रीपर्यंत हा जल्लोष सुरू होता. दरम्यान, तिरंगा फडकवत, आतषबाजी करत आणि घोषणाबाजी करत हा विजय साजरा करणाऱ्यांमध्ये महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. काहीजण विश्वचषकाची प्रतिकृती मिरवत या आनंदात सहभागी झाले. या विजयामुळे कोल्हापूरकरांमध्ये आनंदाचे वातावरण होते. उंच ठिकाणी जाऊन जल्लोषाची छायाचित्रे व व्हिडीओ घेण्यात आले. मोबाइल कॅमेऱ्यावर अनेकांनी छोटे छोटे व्हिडीओ, रिल्स सोशल मीडियावर अपलोड केले. अनेकजण सेल्फी काढत होते.क्रिकेटप्रेमींचे विशेष नियोजन...साप्ताहिक सुटीचा रविवार, रंगपंचमीचा उत्साह आणि भारत-न्यूझीलंड सामन्याचा थरार यामुळे क्रिकेटप्रेमींनी जल्लोषाचे विशेष नियोजन केले होते. अनेकांनी एकत्रित बसून सामन्याचा आनंद लुटला. तालीम संस्था, तरुण मंडळांची कार्यालये, पेठांमधील मुख्य चौक, उद्याने, हॉटेल्स-रेस्टॉरंट व लॉन्समध्ये मोठ्या स्क्रीन लावून सामना पाहण्याचे नियोजन केले होते. रंगपंचमी असल्यामुळे अनेकांनी पुन्हा एकदा रंग उधळून आपला आनंद व्यक्त केला. भारताने सामना जिंकल्याने या नियोजनाचा आनंद द्विगुणित झाला.इचलकरंजीत क्रिकेटप्रेमींचा जल्लोषइचलकरंजी : येथील मलाबादे चौकामध्ये क्रिकेटप्रेमी एकत्र येत मोठा जल्लोष केला. रंगांच्या उधळणीबरोबरच फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. काही षटके शिल्लक असताना क्रिकेटरसिकांनी थेट मलाबादे चौकाकडे येण्यास सुरुवात केली. अनेकांनी वाहने घेऊन तर काहींनी चालत चौक गाठला. त्या ठिकाणी आल्यानंतर हातामध्ये फलक घेऊन वाद्याच्या गजरात मोठा जल्लोष केला.

विविध रंगांची उधळण करण्याबरोबरच हलगी आणि घुमक्याच्या तालावर नृत्याचा ठेका झाला. नागरिकांच्या गर्दीने चौकाचा परिषद फुलून गेला होता. पुरुषाबरोबर महिला आणि लहान मुलांनीही या चौकात हजेरी लावली आणि जल्लोष साजरा केला. तिरंगा ध्वज आणि आपल्या आवडत्या खेळाडूंची छायाचित्रे घेऊन युवकांनी चौकात सहभाग घेतला. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात ठेवला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : India Thrash New Zealand: Celebrations Erupt in Kolhapur's Shivaji Chowk

Web Summary : India's T20 World Cup victory over New Zealand sparked vibrant celebrations in Kolhapur. Cricket fans gathered at Shivaji Chowk, waving flags, setting off fireworks, and chanting patriotic slogans. Celebrations also took place in Ichalkaranji, with music, dancing, and color.