शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मुरलीधर जाधवच्या घरामध्ये क्रिकेट बेटिंग

By admin | Updated: January 25, 2015 01:08 IST

दोघांना अटक

कोल्हापूर : महापालिकेचे विरोधी पक्षनेते व नगरसेवक मुरलीधर पांडुरंग जाधव यांच्या टाकाळा येथील फ्लॅटमध्ये क्रिकेट बेटिंग घेणाऱ्या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी काल, शुक्रवारी छापा टाकून अटक केली. प्रकाश श्रीचंद जग्याशी (वय ४० ), लक्ष्मण सफरमल कटयार (२७, दोघे राहणार प्रेमप्रकाश मंदिरजवळ, गांधीनगर, ता. करवीर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून लॅपटॉप, एलईडी, मोबाईल, प्रिंटर, वॉकमन, मोटारसायकल असा सुमारे एक लाख ४७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.नगरसेवक मुरलीधर जाधव (रा. राजारामपुरी दहावी गल्ली, कोल्हापूर) यांचा शोध पोलीस घेत आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले की, टाकाळा परिसरात जयंत रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये संशयित मुरलीधर जाधव याचा ४०२ क्रमांकाचा फ्लॅट आहे. काल, शुक्रवारी या फ्लॅटमध्ये संशयित प्रकाश जग्याशी व लक्ष्मण कटयार हे दोघे दुपारी आॅस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्याचे लॅपटॉप व मोबाईलद्वारे बेटिंग घेत होते, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोेलिसांनी छापा टाकला. त्यावेळी जग्याशी व कटयार हे दोघे बेटिंग घेत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी दोघांनाही पकडून पोलीस ठाण्यात आणले. त्यानुसार जग्याशीसह जाधववर मुंबई जुगार कायदा कलम ४ व ५ अनुसार रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. याबाबतची फिर्याद पोलीस निरीक्षक अमृत व्ही. देशमुख यांनी दिली. आज अटक केलेल्या प्रकाश जग्याशी व लक्ष्मण कटयार या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. या दोघांना न्यायालयाने त्यांना जामीन दिला. याची नोंद राजारामपुरी पोलिसांत झाली आहे. मुरलीधर जाधव पसार... टाकाळा येथील या अपार्टमेंटमध्ये छापा टाकल्यानंतर संशयित मुरलीधर जाधव हा पोलिसांना बघून या अपार्टमेंटमधील दुसऱ्या जिन्यावरून पसार झाला. काल, शुक्रवारी पोलिसांकडून दिवसभर त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक अमृत व्ही. देशमुख यांनी सांगितले. ४० मोबाईल जप्त... क्रिकेट बेटिंग प्रकरणात पोलिसांना विविध कंपन्यांचे मोबाईल मिळून आले आहेत. या मोबाईलवर आलेले व गेलेले कॉल याची माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर याचा सखोल तपास करणार असून त्याची पाळेमुळे शोधून काढणार असल्याचे तपास अधिकारी देशमुख यांनी सांगितले.