शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

‘सीपीआर’प्रश्नी बेमुदत ठिय्याचा इशारा

By admin | Updated: August 25, 2014 23:12 IST

अधिष्ठाता धारेवर : बचाव कृती समितीचे आंदोलन ; आरोग्यमंत्र्यांचा बैठकीत निषेध

कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील मूलभूत सुविधा व प्रलंबित (सीपीआर) प्रश्नांची कोणतीही सोडवणूक राज्यशासन व महाविद्यालय प्रशासनाने केलेली नाही. दोन महिन्यांत या प्रश्नांची सोडवणूक करतो, असे आश्वासन देणाऱ्या राज्याचे शिक्षण व वैद्यकीय मंत्री, आरोग्यमंत्री यांचा निषेध करत पुढील काही दिवसांत बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय आज, सोमवारी सीपीआर बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाने केला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता यांच्या कार्यालयात ही बैठक झाली. या बैठकीत अधिष्ठाता डॉ. दशरथ कोठुळे यांना धारेवर धरत प्रशासन नुसते आश्वासनाशिवाय काही देत नसल्याचा आरोप सदस्यांनी केला.गरिबांचे आधारवड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीपीआरच्या मूलभूत सोयी व प्रलंबित प्रश्नांसंदर्भात बचाव कृती समितीने अधिष्ठाता यांना रुग्णालयातील २१ प्रश्नांची यादी दिली होती. यामध्ये सीपीआरला पूर्ववत जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा, औषधाचा निधी मिळावा, अशा अनेक प्रश्नांचा समावेश होता. यादीतील बहुतांश: प्रश्नांची राज्यशासनाने सोडवणूक केलेली नाही. त्यामुळे याचा जाब विचारण्यासाठी आज कृती समितीचे निमंत्रक वसंतराव मुळीक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ अधिष्ठातांना भेटले. यावेळी वसंतराव मुळीक यांनी, रुग्णालयामध्ये रुग्णांना सोयी मिळत नाहीत. व्हेंटिलेटर उपलब्ध नाही, औषधांचा तुटवडा आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यावर कोठुळे यांनी, जिल्हा रुग्णालयाचा पूर्ववत दर्जा हा प्रश्न सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील आहे. हे ऐकून समितीतील सदस्य संतापले. त्यांनी दोन महिन्यांपूर्वी आलेल्या वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी, सीपीआरमधील प्रश्न आठ दिवसांत सोडवू, असे आश्वासन दिले होते, पण दोन महिने उलटून गेले तरी त्यांनी कोणत्याही प्रश्नांची सोडवणूक केलेली नाही, असे सांगितले. बाबा इंदुलकर यांनी, उद्या, मंगळवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कोल्हापुरात येणार आहेत. त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाने त्यांची भेट घ्यावी. नांदेडला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला; परंतु सीपीआरला का नाही ? असा प्रश्न उपस्थित केल्यावर कोठुळेंनी प्रथमच नांदेडला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळालेला आहे, असा सीपीआरबाबत कोणताही प्रकार झालेला नाही असे सांगत शेंडा पार्क येथे वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम होणार आहे. त्यामुळे हे महाविद्यालय त्याठिकाणी स्थलांतरित होईल. यावर मुळीक यांनी, पुढील काळात वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे जाहीर करत राज्यशासनाचा निषेध केला.सीटी स्कॅन, सर्पदंशची लस उपलब्ध आहे, पण अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णसेवेवर परिणाम होतो. तसेच पाच व्हेंटिलेटरपैकी दोन व्हेंटिलेटर सुरू आहेत, तर तीन व्हेंटिलेटर कालबाह्य झाली आहेत.- डॉ. दशरथ कोठुळे, अधिष्ठाता सीपीआरप्रश्नी शासनाकडे पाठपुरावा करा. लोकप्रतिनिधींशी चर्चा करा व सकारात्मक निर्णय घ्या तरच हे प्रश्न सुटतील.-वसंतराव मुळीक, निमंत्रकशिष्टमंडळात बाळासो भोसले, भगवान काटे, दिलीप पोवार, भाऊसो काळे, महेश मछले, किशोर घाटगे, प्रसाद जाधव, प्रताप साळोखे,अनिल पाटील,अवधूत पाटील आदींचा सहभाग होता.