शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

CoronaVirus : थुंकणाऱ्या तरुणास आयुक्तांनी केला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 3:31 PM

महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत असलेल्या नागरी सुविधा केंद्राबाहेर थुंकणाऱ्या एका तरुणास आयुक्त डॉ. मल्लिना‌थ कलशेट्टी यांनी गुरुवारी थुंकल्याबद्दल शिक्षा म्हणून १५० रुपयांचा दंड केला. एवढेच नाही तर त्याच्याकडून तो परिसरही पाण्याने स्वच्छ करवून घेतला.

ठळक मुद्देथुंकणाऱ्या तरुणास आयुक्तांनी केला दंड पाणी मारून थुंकलेल्या ठिकाणी केली स्वच्छता

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत असलेल्या नागरी सुविधा केंद्राबाहेर थुंकणाऱ्या एका तरुणास आयुक्त डॉ. मल्लिना‌थ कलशेट्टी यांनी गुरुवारी थुंकल्याबद्दल शिक्षा म्हणून १५० रुपयांचा दंड केला. एवढेच नाही तर त्याच्याकडून तो परिसरही पाण्याने स्वच्छ करवून घेतला.घरफाळा व इतर देयके भरण्यास नागरी सुविधा केंद्रामध्ये गर्दी वाढत आहे. मुख्य प्रशासकीय इमारतीमधील नागरी सुविधा केंद्रामध्ये गुरुवारी सकाळी आयुक्त कलशेट्टी यांनी पाहणी केली. या पाहणीवेळी नागरी सुविधा केंद्रात पैसे भरण्यासाठी ऋतुराज चव्हाण नावाचा एक तरुण तेथे आला होता. तो त्याच ठिकाणी थुंकत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले.यावेळी आयुक्तांनी सदरच्या तरुणास थुंकलेल्या ठिकाणी पाणी मारून ते ठिकाण स्वच्छ करण्यास सांगितले. नंतर विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर यांना  त्यांनी १५० रुपये दंड करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार चव्हाण यास सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल १५० रुपयांची दंडाची पावती केली.आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांच्या सहभागाची आवश्यकता असून, सर्वांनी मिळून शहर स्वच्छ व सुंदर करावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकून घाण करू नये, असे आवाहन आयुक्त कलशेट्टी यांनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर