CoronaVirus : कोल्हापुरात आढळले डेल्टा प्लस विषाणूचे तीन रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 22:55 IST2021-08-15T22:54:37+5:302021-08-15T22:55:38+5:30
जिल्ह्यात डेल्टा प्लस रुग्ण सापडल्याने प्रशासन गतिमान झाले असून सदर रुग्ण राहत असलेल्या परिसरातील सर्व नागरिकांची तपासणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत

CoronaVirus : कोल्हापुरात आढळले डेल्टा प्लस विषाणूचे तीन रुग्ण
कोल्हापूर- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला होता. जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच रविवारी जिल्ह्यात डेल्टा प्लस विषाणूंचे एकूण सहा रुग्ण सापडले. त्यापैकी कोल्हापूर शहरात 3, हातकणंगलेमध्ये 2 व निगवे दुमाला (ता.करवीर) मध्ये 1 रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. शहरात सापडलेल्या तीन रुग्णांपैकी एक रुग्ण विचारे माळ येथील असून दोन रुग्ण सानेगुरुजी वसाहतींमधील आहेत. (CoronaVirus Three patients with Delta Plus virus found in Kolhapur)
जिल्ह्यात डेल्टा प्लस रुग्ण सापडल्याने प्रशासन गतिमान झाले असून सदर रुग्ण राहत असलेल्या परिसरातील सर्व नागरिकांची तपासणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत