CoronaVirus in Kolhapur: कोल्हापुरात कोरोनाचा शिरकाव; दोन रुग्ण आढळल्यानं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 23:49 IST2020-03-26T23:48:04+5:302020-03-26T23:49:19+5:30
एकाच दिवशी दोन रुग्ण पॉझिटिव्ह

CoronaVirus in Kolhapur: कोल्हापुरात कोरोनाचा शिरकाव; दोन रुग्ण आढळल्यानं खळबळ
कोल्हापूर: कोल्हापुरात कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. पेठवडगावातील एका महिलेला तर कोल्हापुरातील एका पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. या दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
पुण्यातून आलेल्या ३९ वर्षीय तरुणास कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. २० मार्च रोजी कोल्हापूर येथे सीपीआर रुग्णालयात त्याची तपासणी झाली होती. तर सांगलीतल्या इस्लामपूरमधील एका कोरोनाबाधित कुटुंबाच्या संपर्कात आल्यानं पेठवडमधील एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या शेजारील सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 11 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर शेजारच्या सिंधुदुर्ग आणि साताऱ्यातही कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. आजपर्यंत कोल्हापुरात कोरोनाचा रुग्ण आढळला नव्हता. मात्र आज एकाच दिवशी दोन रुग्ण आढळून आल्यानं जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.