CoronaVirus : कोरोनाचा जिल्ह्यात आठवा बळी, आजरा तालुक्यात दुसरा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 02:24 PM2020-06-06T14:24:54+5:302020-06-06T14:31:09+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात आज ५२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यु झाला. सीपीआर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. हा रुग्ण आजरा तालुक्यातील असुन तेथील हा दुसरा मृत्यु आहे. त्यांना काल सीपीआर मध्ये दाखल केले होते, आजच त्यांचा स्वॅब घेतला होता. अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. कोरोनाचा जिल्ह्यातील हा आठवा बळी आहे.

CoronaVirus: Eight victims in Corona district, | CoronaVirus : कोरोनाचा जिल्ह्यात आठवा बळी, आजरा तालुक्यात दुसरा मृत्यु

CoronaVirus : कोरोनाचा जिल्ह्यात आठवा बळी, आजरा तालुक्यात दुसरा मृत्यु

Next
ठळक मुद्देकोरोनाचा जिल्ह्यात आठवा बळीआजरा तालुक्यात दुसरा मृत्यु

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आज ५२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यु झाला. सीपीआर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. हा रुग्ण आजरा तालुक्यातील असुन तेथील हा दुसरा मृत्यु आहे. त्यांना काल सीपीआर मध्ये दाखल केले होते, आजच त्यांचा स्वॅब घेतला होता. अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. कोरोनाचा जिल्ह्यातील हा आठवा बळी आहे.

६५९ पैकी आजअखेर ४२२ रूग्णांना डिस्चार्ज

आजअखेर ६५९ रूग्णांपैकी ४२२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज सकाळी १० वाजेपर्यत एकही अहवाल पॉझीटिव्ह आलेला नाही. आजअखेर जिल्ह्यात एकूण २३० पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे

आजरा- ६३ , भुदरगड- ६७, चंदगड- ७५, गडहिंग्लज- ६९, गगनबावडा- ६, हातकणंगले- ६, कागल- ५५, करवीर- १४, पन्हाळा- २५, राधानगरी- ६३, शाहूवाडी- १६९, शिरोळ- ७, नगरपरिषद क्षेत्र- ११, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-२१ असे एकूण ६५१आणि पुणे -१, सोलापूर-३, कर्नाटक-२, आंध्रप्रदेश-१ आणि मुंबई-१ असे इतर जिल्हा व राज्यातील आठ असे मिळून एकूण ६५९ रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

जिल्ह्यातील एकूण ६५९ रूग्णांपैकी ४२२ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ७ जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या २३० इतकी आहे.

Web Title: CoronaVirus: Eight victims in Corona district,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.