शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

corona virus : राज्य सरकारचे पथक कोल्हापुरात येण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 4:29 PM

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून साततत्याने चढत्या क्रमाने कोरोना रुग्ण आढळून येत असून मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. ...

ठळक मुद्देराज्य सरकारचे पथक कोल्हापुरात येण्याची शक्यताकराडच्या बैठकीत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली कबुली

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून साततत्याने चढत्या क्रमाने कोरोना रुग्ण आढळून येत असून मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. या पार्श्वभूमीवर यापुढील काळात साथ रोखण्यासाठी तसेच मृत्यू दर कमी करण्याकरिता काय करायला पाहिजे याची माहिती घेण्याच्या अनुषंगाने तसेच येथील आरोग्य यंत्रणेला मदत करण्याकरिता राज्य सरकारचे एक पथक लवकरच कोल्हापुरात येण्याची शक्यता आहे.रविवारी कराड येथे आरोग्य मंत्री राजेश टोपे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील मंत्री, आमदार खासदार, वरिष्ठ अधिकारी यांची एक बैठक झाली.

या बैठकीत दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोरोना रुग्णांची साखळी तुटत नसून ती अधिकाधिक घट्ट होत चालल्याची कबुलीच दिली. जिल्हा व आरोग्य प्रशासन चांगले प्रयत्न करत असले तरी वाढत्या रुग्ण संख्येमुळे त्यावर बऱ्याच मर्यादा येत आहेत. एक प्रकारे परिस्थिती हाताबाहेर गेल्याची कल्पनाच बैठकीत करुन देण्यात आली.दोन जिल्ह्यात प्रशासनाकडून करण्यात येत असलेले प्रयत्न अपूरे असल्याचे मंत्री टोपे व पवार यांच्या लक्षात आले. त्यामुळे पुढील काळात कोरोनाची ही साखळी तोडायची असेल तर आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक पाठवून देऊन काय उपाययोजना कराव्या लागतील याची माहिती घेतली जाणार आहे. लवकरच असे एक पथक कोल्हापूरला येईल, असे सांगण्यात आले.कोल्हापूर पेक्षा मुंबईत जास्त परिस्थिती गंभीर आहे. तेथे कशा प्रकारे कोरोना संसर्ग रोखण्याचे प्रयत्न होत आहेत. जंबो कोविड सेंटर्स उभारली आहेत. रुग्णांवर उपचार कशा प्रकारे केले जात आहेत. आरोग्य यंत्रणेला प्रशिक्षण कसे दिले जात आहे. याची सगळी माहिती कोल्हापूर व सातारा आरोग्य प्रशासनाला सुध्दा देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. म्हणूनच असे एक पथक लवकरच पाठविले जाणार असल्याचे कराडच्या बैठकीत स्पष्ट झाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर