corona virus: recitation of community prayers using a mask | corona virus : मास्क वापरून झाले सामुदायिक नमाज पठण

कोल्हापुरात आठ महिन्यांनंतर शुक्रवारचे सामुदायिक नमाज पठण मुस्लिम बांधवांनी मुस्लिम बोर्डिंगच्या मैदानावर मास्क, सोशल डिस्टन्सिंग अशा नियमांचे पालन करीत केले.

ठळक मुद्देमास्क वापरून झाले सामुदायिक नमाज पठणहिलाल समितीच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद

कोल्हापूर : शहरात आठ महिन्यांनंतर शुक्रवारचे सामुदायिक नमाज पठण मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंग पाळून झाले. हिलाल समितीच्या आवाहनास मुस्लिम बांधवांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंगच्या मैदानावर दुपारी सव्वादोनच्या सामुदायिक नमाज पठणावेळी मुस्लिम बांधवांनी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करीत सहभाग घेतला.

कोरोनामुळे राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे बंद होती. १५ ते २० लोकांच्या उपस्थितीमध्येच मस्जिदीमध्ये नमाज पठणाला परवानगी होती. सर्व मुस्लिम बांधव घरामध्येच नमाज पठण करीत होते. सध्या कोरोनाची साथ आटोक्यात येत असल्याने शासनाकडून सर्व प्रार्थनास्थळे खुली करण्यात आली आहेत. आठ महिन्यांनंतर प्रथमच शुक्रवारचे सामुदायिक नमाज पठण झाले. यावेळी शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. गुरुवारी हिलाल कमिटीच्या बैठकीत नियमांचे पालन करण्याच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला.

 

Web Title: corona virus: recitation of community prayers using a mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.