शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

corona virus : कोल्हापुरात रूग्णसंख्या १२ हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 5:38 PM

कोल्हापूर शहरातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या चिंता वाढवणारी ठरत आहे. ही संख्या आता १३ हजार आकड्याकडे झेपावत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरात रूग्णसंख्या १२ हजार पारमृतांची संख्या ३४१ वर, आगस्टमध्ये कहर सुरूच

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर काही केल्या थांबण्याची चिन्हे नसून दिवसेंदिवस ही संख्या वाढतानाच दिसत आहे. सुरूवातीला ग्रामीण काही तालुके आणि इचलकरंजी वगळता अन्यत्र फारशी बाधा होताना दिसत नव्हती. मात्र आता कोल्हापूर शहरातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या चिंता वाढवणारी ठरत आहे. ही संख्या आता १३ हजार आकड्याकडे झेपावत असल्याचे चित्र आहे.मार्च महिन्यामध्ये कोरोना संसर्ग देशभरात सुरू झाल्यानंतर ११ मार्चला जनता कर्फ्यू पुकारण्यात आला. नंतर लगेचच महाराष्ट्रामध्ये लाकडाउनला सुरूवात झाली. याच दरम्यान मुंबई, पुण्याहून हजारो नागरिक रोज गावाकडे परतू लागले. परंतू मार्च महिन्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात केवळ २ रूग्णांचा अहवाल पाझिटिव्ह आला होता.

२६ मार्च २०२० रोजी कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रूग्ण सापडला. येथील भक्तीपूजानगर येथे पुण्याहून आपल्या बहिणीकडे आलेल्या गृहस्थाला पहिल्यांना कोरोनाची लागण झाली. लगेचच दोनच दिवसात त्याच्या बहिणीचाही अहवाल पाझिटिव्ह आला. दोघेही खासगी रूग्णालयात उपचार घेवून बरे होवून घरी परतले.

याच दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढत राहिल्याने गावोगावी शाळांमध्ये त्यांची सोय करण्यात आली. या महिन्यामध्ये प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा केवळ या संस्थात्मक अलगीकरणाच्या तयारीमध्ये गुंतली होती. संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये केवळ १२ नागरिकांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पहिले दोन महिने अगदी नगण्य संख्येने कोरोनाचे रूग्ण आढळले.मे महिन्यामध्ये मात्र ही संख्या वाढत गेली. शाहूवाडी तालुक्यात एकामागोमाग एक रूग्ण आढळले. इचलकरंजीमध्ये पहिल्यापासूनच कोरोनाचे रूग्ण सापडू लागले. मे महिन्यातील रूग्णांची संख्या ५९३ झाली. तर या महिन्यात ६ जणांचा मृत्यूही झाला. जूनमध्ये पुन्हा ही वाढ कमी होत गेली आणि महिन्याभरातील ही संख्या २४३ वर आली.परंतू ११ जणांचा मृत्यू झाला. जूनपर्यंत ही संख्या प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या आटोक्यातील वाटत होती.मात्र जुलै महिन्यातील १० तारखेनंतर प्रतिदिन ३०० पासून ७०० पर्यंत कोरोनाचे रूग्ण पाझिटिव्ह येवू लागले. मग मात्र आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येवू लागला. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यूही होवू लागल्याने प्रशासनाने ही गोष्ट गांभिर्याने घेतली. तालुका पातळीवर कोविड उपचार केंद्रे तयार करण्याच्या सुचना दिल्या गेल्या. जुलै महिन्यामध्ये नवे ५४६२ रूग्ण आढळले तर १८१ जणांचा मृत्यू झाला. याच दरम्यान खासगी रूग्णालयांमध्ये नागरिकांना दाखल करताना अडचणी येवू लागल्यामुळे महापालिकेला शहरातील अनेक रूग्णालये अधिग्रहित करावी लागली.जुलैच्या तुलनेत आगस्टमध्ये तर कोरोनाने कहर सुरू केला आहे. जुलै मध्ये महिन्यात ५४६२ रूग्ण आढळले असताना आता १२ आगस्ट रोजी म्हणजे केवळ १२ दिवसात जिल्ह्यात ५९६६ इतके नवे रूग्ण आढळल्याने आणि या १२ दिवसात १६० मृत्यू झाल्यामुळे आता आरोग्य यंत्रणा हादरली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय