शहरं
Join us  
Trending Stories
1
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
2
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
3
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
4
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
5
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
6
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
7
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
8
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
9
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
10
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
11
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
12
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
13
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
14
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
15
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
16
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
17
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
18
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
19
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
20
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur -अवघी मराठा कॉलनी हादरली, पाचशे मीटर परिसर क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 19:25 IST

कसबा बावड्यातील भगव्या चौकातून डावीकडील असलेल्या मराठा कॉलनीतील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा खडबडून जागी झाली आणि सगळी यंत्रणा पाच ते सहा मिनिटांत प्रत्यक्ष जागेवर पोहोचली तेथेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे नियोजन व आदेशही झाले. तत्काळ आदेशाची अंमलबजावणी देखील सुरू झाली. मात्र, या प्रकाराने संपूर्ण कॉलनी हादरून गेली. रहिवाशी चिडीचूप झाले.

ठळक मुद्देअवघी मराठा कॉलनी हादरली, पाचशे मीटर परिसर क्वारंटाईनपाच मिनिटांत पोहोचली सगळी यंत्रणा

कोल्हापूर : कसबा बावड्यातील भगव्या चौकातून डावीकडील असलेल्या मराठा कॉलनीतील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा खडबडून जागी झाली आणि सगळी यंत्रणा पाच ते सहा मिनिटांत प्रत्यक्ष जागेवर पोहोचली तेथेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे नियोजन व आदेशही झाले. तत्काळ आदेशाची अंमलबजावणी देखील सुरू झाली. मात्र, या प्रकाराने संपूर्ण कॉलनी हादरून गेली. रहिवाशी चिडीचूप झाले.

जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे सीईओ अमल मित्तल सोमवारी सकाळच्या सत्रातील आपापली कामे आटोपून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. दुपारी कार्यालयातच डबे मागवून घेऊन जेवण आटोपले. त्याचवेळी दुपारी सव्वा तीन वाजता कसबा बावड्यातील मराठा कॉलनीत एक महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा निरोप सीपीआरकडून मिळाला. आतापर्यंत निर्धास्त असलेली आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तत्काळ सक्रिय झाली.

आयुक्त कलशेट्टी, सीईओ मित्तल, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त अधीक्षक तिरूपती काकडे, शहर उपाधीक्षक प्रेरणा कट्टे, महापालिका आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे तत्काळ मराठा कॉलनीत धावले. पोलिसांच्या मदतीने संबंधित कोरोनाबाधित महिलेच्या घरातील निकटच्या पाच व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांना रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालयात नेण्यात आले.

मराठा कॉलनीचा पाचशे मीटर परिसर सील करण्यात आला. तीन ठिकाणी रस्त्यांवर बॅरिकेट लावून रस्ते बंद करण्यात आले. त्या परिसरातून कोणाला बाहेर पडण्यास अथवा आत जाण्यास पूर्णपणे मज्जाव करण्यात आला. महापालिकेची सफाई कर्मचारी, औषध फवारणीच्या सर्व कर्मचाऱ्यांना तत्काळ बोलावून घेऊन बाधित महिलेचे संपूर्ण घर तसेच आसपासची चार ते पाच घरे पूर्णत: औषधांनी धुवून काढली नंतर संपूर्ण परिसरात औषध फवारणी सुरू करण्यात आली. मराठा कॉलनीतील पाचशे मीटर परिघात राहणाऱ्या प्रत्येक घरातून नागरिकांची तपासणी सुरू करण्यात आली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर